Tur Procurement: तूर खरेदीत वाढ! अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

Tur Market: राज्यात नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीने अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे. बाजारभाव अस्थिर असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून, खरेदी केंद्रांवर नोंदणीही वाढत आहे.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Akola News: राज्यात ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत हमीभावाने सुरू असलेल्या तूर खरेदीला गेल्या काही दिवसांत हळूहळू वेग येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात विविध खरेदीदार एजन्सी मिळून सुमारे दोन लाख ६१ हजार क्विंटल तुरीची खरेदी पूर्ण झाली आहे. बाजारात दर कमी असतानाही हमीभाव केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकरी तितकेसे उत्सुक दिसून आलेले नाहीत.

या हंगामासाठी शासनाने तुरीचा ७५५० रुपये हमीदर जाहीर केलेला आहे. दुसरीकडे बाजारपेठेत तुरीला किमान ५५०० पासून दर मिळतो आहे. कमाल दर ७६०० रुपयांपर्यंत असला तरी सरासरी ७२५० रुपये दरच गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात पडला.

Tur
Tur Procurement: शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी बंद; ७,९७८ शेतकऱ्यांनी केली नोंदणी!

मार्च एण्डमुळे गेले काही दिवस बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्याने आता नव्याने बाजार उघडल्यानंतर तुरीला दर किती मिळतो हे स्पष्ट होईल. तुरीच्या नोंदणीलाही शासनाने १५ दिवसांची मुदत वाढवून दिल्याने आणखी काही शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा वाढू शकते. शिवाय बाजारातील किमान दर पाहता उत्पादक आपला माल या ठिकाणी विक्रीसाठी आणू शकतात.

या हंगामात ‘नाफेड’ची तूर खरेदी एक लाख ९६ हजार क्विंटलपर्यंत झाली आहे. यात प्रामुख्याने राज्याच्या पणन विभागाच्‍या २२९ केंद्रांवर ९६ हजार ९५९ क्विंटल तुरीचा समावेश आहे. याशिवाय विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ८४ केंद्रांवर ४७ हजार क्विंटल, पृथाशक्तीने ६७ केंद्रांवर २९८५१ क्विंटल, महाकिसान संघाच्या ५९ केंद्रांवर १३००० क्विंटल, महाकिसान वृद्धीच्या ४३ केंद्रांवर ८८७१ क्विंटल तुरीची खरेदी झाली. ‘नाफेड’ने ५३४ केंद्र सुरू केली असून, त्या ठिकाणी नोंदणी झालेल्या ७९ हजार ६५३ शेतकऱ्यांपैकी १३,१३६ शेतकऱ्यांची ही तूर आहे.

Tur
Tur Procurement : ‘नाफेड’च्या तूर नोंदणीस १५ दिवसांची मुदतवाढ ; शासकीय खरेदीला तुलनेने प्रतिसाद कमीच

तर राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या (एनसीसीएफ) १६० केंद्रांवर ६५ हजार ८७७ क्विंटल तूर खरेदी आजवर झाली. या महासंघामार्फत पणन विभाग, विदर्भ मार्कटिंग फेडरेशन, पृथाशक्ती, महाकिसान संघ, महाकिसान वृद्धी असलेल्या उपखरेदीदार एजन्सी काम करीत आहेत. या महासंघाकडे सुमारे १४ हजार ८२९ शेतकऱ्यांची ३० मार्चपर्यंत नोंदणी झालेली आहे. यापैकी ६,१६५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीला नेली आहे.

नोंदणीकृत शेतकरी - ९४,४८२ शेतकरी

तूर विक्री करणारे शेतकरी - १९,३०१ शेतकरी

एकूण खरेदी - २,६१,८७७ क्विंटल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com