
Domestic Electric Bill Maharashtra : महावितरणकडून नवीन वीजदर लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. याबाबत महावितरणकडून महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीजदर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. यानुसार १० टक्क्यांनी वीज दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर (ता.२९) शासन निर्णय जाहीर करण्यात आला. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत. मात्र, या निणयाचा लाभ सर्वच ग्राहकांना होणार नसून तो फक्त स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
याबाबत कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, ग्राहकांच्या वीज वाढीच्या दबावामुळे महाआयोगाकडे आलेल्या हरकतींवरून वीजदर कपातीचे निर्देश महावितरणला दिले आहेत. दरम्यान जे स्मार्ट मीटर बसवलेले ग्राहक आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे भविष्यात स्मार्ट मीटर बंधनकारक होऊ शकते. महावितरणने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच नाही पण काही ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रति युनिट ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येणार आहे. अशा महितीचे परिपत्रक महावितरणकडून जाहीर करण्यात आले आहे.
महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. यावर १ एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू होणार आहेत. महावितरणकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात पुढील ५ वर्षे वीजेचा दर कमीच राहणार आहे.
घरगुती वीज वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांकडे बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. टीओडी सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. तथापि घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत.
सुट्टी दिवशीही भरणा केंद्र सुरू राहणार
मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे होण्यासाठी महावितरणकडून सुट्टी दिवशीही भरणे केंद्र सुरू ठेवले आहे. भरणा केंद्र शनिवार (ता. २९) ते सोमवार (दि.३१) रोजी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.