MP Shahu Maharaj : भात संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील, खासदार शाहू महाराजांनी दिला शब्द

Cashew Production : आजरा तालुक्यात भात, काजू व बांबू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथील भौगोलिक परिस्थिती, हवामान, पाऊस या पिकांसाठी अनुकूल व पोषक आहे.
MP Shahu Maharaj
MP Shahu Maharajagrowon

Kolhapur Ajara Rice Production : आजरा तालुक्यात भात, काजू व बांबू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथील भौगोलिक परिस्थिती, हवामान, पाऊस या पिकांसाठी अनुकूल व पोषक आहे. या पिकामध्ये संशोधन, उत्पादन वाढ होण्याची गरज आहे. त्यामुळे येथे भात संशोधन केंद्र, काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले.

खासदार शाहू महाराज यांनी आजरा तालुक्याचा आभार दौरा केला. येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महाविकास आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते. मुकुंद देसाई, जयवंत शिंपी, उमेश आपटे, अंजनाताई रेडेकर, संभाजी पाटील, उदयराज पवार, विद्याधर गुरबे, रामराजे कुपेकर प्रमुख उपस्थित होते.

मुकुंद देसाई यांनी स्वागत केले. ‘संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘या निवडणुकीत तालुका एकत्रितपणे पाठिशी उभा राहिला. जी एकी व संघटितपणा निवडणुकीत जनतेने दाखवला त्याचपद्धतीने विकासकामात संघटितपणा दाखवूया.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘खासदार शाहू महाराज यांच्या विजयाने जिल्ह्यातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार दिल्लीला पाठवले आहेत. आगामी काळात या तालुक्याच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणला जाईल.’

व्ही. बी. पाटील म्हणाले, ‘या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची साथ दिली. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीला तीन आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी.’

मसणू सुतार, रशिद पठाण, युवराज पोवार, अभिषेक शिंपी, संजय सावंत, रवींद्र भाटले, रणजित देसाई, प्रभाकर कोरवी, अशोक तर्डेकर, विक्रमसिंह देसाई, किरण कांबळे, शांताराम पाटील, संतोष मासोळे, संजीवनी सांवत, रचना होलम, डॉ. राजलक्ष्मी देसाई आदी उपस्थित होते.

जनतेने भाजपवर अंकुश ठेवला

सत्ताधारी भाजपने देशात चालवलेल्या हुकूमशाहीला जनतेने निकालातून अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. धाकट दडपशाही हे लोकशाहीत अपेक्षित नव्हते. निवडणुकीत सर्वसामान्य माणसांची ताकद दिसून आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com