MP Nilesh Lanke
MP Nilesh Lanke Agrowon

Nagar-Manmad Protest : रस्त्याचे काम सुरू; लंके यांचे उपोषण मागे

Nilesh Lanke Protest : अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते सावळी विहीर शिर्डी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
Published on

Ahilyanagar News : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने तसेच हे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंदरकर यांच्या वतीने देण्यात आल्याने खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले बेमुदत आंदोलन शनिवारी सायंकाळी मागे घेण्यात आले.

अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते सावळी विहीर शिर्डी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू करून लंके यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या लेखी आश्वासनात नमुद करण्यात आले आहे की, या आंदोलनाची दखल घेत आम्ही या रस्त्याच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ठेकेदाराने शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम, शनिशिंगणापूर फाटा येथे मिलिंगचे काम तसेच देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मौजे कणगर आणि मौजे पिंपरी निर्मळ येथे प्लॅन्ट उभारणी आणि यंत्र सामग्री व लॅबोरेटरी उभारण्यात आली आहे.

MP Nilesh Lanke
Nagar-Manmad Highway : रस्त्यासाठी किती अंत पाहणार?

दरम्यान, खा. नीलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ठेकेदारास शनिवारी काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासून खा. लंके यांचे सहकाऱ्यांनी या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले किंवा नाही याची पडताळणी केली. सहकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर नीलेश लंके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यास मान्यता दर्शविली.

MP Nilesh Lanke
MP Nilesh Lanke : संरक्षण विभागाच्या परिसरातील बंद रस्ते खुले करण्याची गरज

ठेकेदारास मुदतवाढ नाही

ठेकेदाराने काम सुरू करून कालबद्ध वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन सुरवातीस देण्यात आले होते. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही, याचा समावेश लेखी आश्वासनात हवा अशी मागणी लंके यांनी यावेळी केली.

त्यानंतर आश्वासनात ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही. या प्रकल्पाचे काम सातत्याने सुरू राहील व विहित वेळेत पूर्ण केले जाईल असे प्रकल्प ठेकेदाराने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयास आश्वासित केले आहे. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर नियमोचित दंडात्मक कारवाई केली जाईल याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com