Nagar-Manmad Highway : रस्त्यासाठी किती अंत पाहणार?

MP Nilesh Lanke : नगर- मनमाड रस्त्याने अनेक लोकांचे बळी घेतले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
MP Nilesh Lanke
MP Nilesh Lanke Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : नगर- मनमाड रस्त्याने अनेक लोकांचे बळी घेतले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किती लोकांचे या रस्त्यावर बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करत विळद बाह्यवळण (ता. नगर) ते सावळीविहीर (ता. राहाता) या ७५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे. हे काम सुरू झाल्याशिवाय माघार नाही असे सांगत खासदार नीलेश लंके यांनी शनिवारी (ता. १२)ही उपोषण सुरूच ठेवले आहे.\

अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते सावळीविहीर (शिर्डी) रस्त्याचे काम करावे आणि या कामांत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ११) बेमुदत उपोषण सुरू केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लंके यांनी उपोषणास सुरुवात केल्यानंतर लगेच भेट घेऊन पावसामुळे दोन महिने वाट पाहून त्यानंतर काम सुरू करू, अशी भूमिका मांडली. मात्र लंके यांनी तातडीने काम सुरू करण्यावर ठाम राहिल्याने अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली.

MP Nilesh Lanke
MP Nilesh Lanke : संरक्षण विभागाच्या परिसरातील बंद रस्ते खुले करण्याची गरज

गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाच्या कामाची प्रतीक्षा आहे. २०१८ पासून रखडलेले हे काम आता तिसऱ्यांदा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात चार वर्षात ३८८ प्रवाशांना जीव गमवावा लागला.

MP Nilesh Lanke
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ नसून हा ‘सक्तीपीठ’ महामार्ग : देशमुख

जिल्ह्यातील चार आमदार व दोन खासदारांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातो, असे असतानाही या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, ही प्रशासनाचे आणि सरकारचे अपयश असल्याचे लंके यांचे म्हणणे आहे. एप्रिल २०२५ मध्ये ठेकेदाराला काम आरंभ आदेश देण्यात आला आहे. आता रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय माघार नाही असे लंके म्हणाले.

या रस्त्याबाबत सारेच हतबल

अहिल्यानगर-मनमाड मार्गावरील अहिल्यानगरपासून शिर्डी-सावळीविहीर पर्यत अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले आहे. यासाठी सर्व पातळीवर अंदोलने, मोर्चे झाले. अगदी केंद्रीय रस्तेवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा या रस्त्याबाबत हतबलता व्यक्त केली.

ठेकेदार टिकत नसल्याचा आरोप होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्षेत्रातच बहुतांश रस्ता येतो. रस्त्याचे काम होईल एवढेच सांगितले जात असले तरी या रस्त्याबाबत सारेच हतबल असल्याचे पहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com