Mosambi Crop Damage : फळगळीने वाताहत; भौगोलिक मानांकनाचा फायदाही मर्यादितच

Mosmabi Fruit Fall : फळगळीने मोसंबी उत्पादकांची पुरती वाताहत झाली आहे. परंतु या समस्येवर कोणताही ठोस उपाय कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून निघाला नाही.
Mosambi Growers
Mosambi Growers Agrowon
Published on
Updated on

Jalna News : फळगळीने मोसंबी उत्पादकांची पुरती वाताहत झाली आहे. परंतु या समस्येवर कोणताही ठोस उपाय कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून निघाला नाही. शिवाय भौगोलिक मानांकनाचा वापरही मर्यादेपुढे सरकत नाही. याकडे कृषी विभागाचेही दुर्लक्ष असल्याची खंत जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघाने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना सोमवारी (ता. २) निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, जालना जिल्ह्यातील मोसंबी फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त होऊन जवळपास सहा वर्षे लोटली.

जालना हे मोसंबीचे महत्त्वाचे केंद्र असून येथे मोसंबी संशोधन केंद्र देखील आहे. परंतु दोन वर्षांपासून मोसंबीच्या फळगळीवर कोणताही ठोस उपाय शास्त्रज्ञांना काढता आला नाही. त्यामुळे मोसंबी उत्पादकांचा अर्थकारण कोलमडले आहे.

Mosambi Growers
Mosambi Farming : मोसंबीच्या फळगळीची कळ सोसता सोसवेना

केवळ मोसंबी बागायतदारांसाठीचे भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. याचा अभिमान असायला हवा. परंतु आजपर्यंत याबाबतीत कोणतेही ठोस प्रयत्न झालेले दिसत नाही. संघाच्या माध्यमातून या कामासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले. ते किती टिकतील माहीत नाही, परंतु आता तरी जिल्हा प्रशासनाने भौगोलिक मानांकन मिळालेल्या जालना मोसंबीच्या मार्केटिंगसाठी तिच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न करावे अशी विनंती जालना जिल्हा मोसंबी व फळे बागायतदार संघाच्यावतीने अध्यक्ष पांडुरंग डोंगरे व सचिव अतुल लढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोसंबीची होत नाही मार्केटिंग

मोसंबीची योग्य प्रकारे मार्केटिंग होण्यासाठी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, सर्व हायवे रस्ते, समृद्धी महामार्ग अशा प्रमुख ठिकाणी मोठे होर्डिंग लावणे आवश्यक आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालयामध्ये जालना मोसंबीचे कट आउट बॅनर्स किंवा फोटो फ्रेम लावणे आवश्यक असल्याची बाब फळे व मोसंबी बागायतदार संघाने अधोरेखित केली आहे.

Mosambi Growers
Mosambi Rate : मागणी अभावी संत्रा, मोसंबी रोपांचे भाव दबावात

मोसंबीच्या लिफाफ्याचा सरकारी कार्यालयातच नाही वापर

दोन वर्षांपूर्वी जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघाच्या प्रयत्नातून इंडियन पोस्टाच्या माध्यमातून स्पेशल पोस्टल लिफाफा मोसंबी संदर्भात प्रकाशित करण्यात आला. परंतु एकाही सरकारी कार्यालयात या लिफाफ्याचा वापर होताना दिसला नाही. मोसंबीची मार्केटिंग आपणच करणार नाही तर दुसरे कोण करणार? सुंदर गुणधर्म असलेल्या जालना मोसंबीचे व्यापक स्तरावर मार्केटिंग होणे आवश्यक नाही का, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

जगाला कसे कळेल जालना मोसंबीचे ‘हब’

जिल्ह्यात अंदाजे २०००० शेतकरी मोसंबीची लागवड करतात. परंतु आजपर्यंत जिल्ह्यातील केवळ १३०० बागायतदारांनी जालना मोसंबीच्या भौगोलिक मानांकनांचा वापर केला आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करत असल्याची बाब चिंताजनक आहे. जोपर्यंत अधिकाधिक बागायतदार भौगोलिक मानांकनाचा वापर करणार नाहीत तोपर्यंत जालन्यात २० हजार हेक्टर मोसंबी लागवड असल्याचे जगाला कसे कळणार असा सवाल जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com