Private Market : मोसम खासगी मार्केटचा परवाना निलंबित

Onion Market : कुपखेडा येथे स्थापन झालेल्या मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुणे येथील पणन संचालक विकास रसाळ यांनी निलंबित केला आहे.
Onion Market
Onion Market Agrowon

Nashik News : कुपखेडा येथे स्थापन झालेल्या मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुणे येथील पणन संचालक विकास रसाळ यांनी निलंबित केला आहे. नामपूर बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी याबाबत पणन संचालकांकडे केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

नामपूर बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव गेल्या मार्चअखेरपासून बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समितीचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लेव्हीच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी कुपखेडा शिवारात गट नंबर ५२, ५३, ५४ /१, ५४ / २ येथे बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्राच्या शेजारीच मोसम खासगी कृषी मार्केटचा सुरू केले.

परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्याही पायाभूत सुविधा नसणे, आदर्श आचारसंहिता कालावधी, सभापती, सचिवांचे पत्र आदी बाबींचा विचार करून परवाना पणन संचालकांनी निलंबित केला आहे.

Onion Market
Onion Purchase Center Inspection : खासगी कांदा खरेदी केंद्र तपासणीसाठी १२ पथके

नामपूर बाजार समितीमधील सर्व नोंदणीकृत व्यापारी, अडत्यांनी वेगळा गट स्थापन करून नामपूर बाजार समितीच्या नळकस रस्त्यावरील लिलाव आवारालगत मोसम कृषी खासगी मार्केट प्रा. लि. या नावाने खासगी बाजार समिती स्थापन केली.

कुपखेडा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ५२, ५३ व ५४ मध्ये खासगी मार्केटसाठी कुपखेडा ग्रामपंचायतीने अटी-शर्थीच्या अधीन राहून ना-हरकत दाखला दिला आहे. पायाभूत सुविधांमध्ये तात्पुरते पत्र्याचे शेड आहेत. तसेच, बांधकामासाठी करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, नगररचना विभाग, महसूल वन विभागाकडून अकृषक परवानगी घेतलेली नाही.

या मार्केटचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या कुटुंबात नाफेड, एनसीसीएफ परवानाधारक व थेट परवानाधारक आहेत. यात शासनाची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. खासगी बाजार समितीचा परवाना हा नामपूर बाजार समितीतील नोंदणीकृत व्यापारी, अडत्यांना दिलेला आहे.

Onion Market
Onion Market : नियमनमुक्तीद्वारे फुटली कांदा कोंडी

त्यामुळे नामपूर बाजार समितीमधील सर्व लिलाव प्रक्रिया बंद पडलेली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची स्पर्धा निर्माण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. बाजार समितीमधील हमाल, माथाडींवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी लेखी तक्रार बाजार समिती प्रशासनाने केल्यानंतर पणन संचालकांनी कारवाई केली आहे.

‘शेतीमालाचे व्यवहार करू नयेत’

‘‘कुपखेडा शिवारातील मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात येत आहे. या खासगी बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार करू नयेत, याची शेतकऱ्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी,’’ असे पणन संचालक विकास रसाळ यांनी नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com