E-Mahabhumi: वर्षभरात सव्वातीन कोटींहून अधिक दस्तऐवज डाउनलोड

Digital Land Records: राज्य शासनाच्या ‘ई-महाभूमी’ प्रकल्पामुळे नागरिकांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा, खाते उतारा व फेरफार मिळू लागले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ३.२५ कोटी दस्तऐवज ऑनलाइन डाउनलोड झाले, यामुळे महसूल यंत्रणेला ७६ कोटी ८० लाखांचा महसूल मिळाला.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Pune News: केंद्र शासनाच्या जमीनविषयक डिजिटल कामकाज प्रकल्पांना राज्य शासनाने ‘ई-महाभूमी’च्या माध्यमातून राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गेल्या आर्थिक वर्षात सव्वातीन कोटींहून अधिक दस्तऐवज ऑनलाइन प्रणालीतून डाउनलोड केले आहेत.

सामान नागरिकांना महसूल कार्यालयात हेलपाटे न मारावे लागू नये यासाठी शासनाने ई-महाभूमी प्रकल्प राबविला. त्यातून विविध प्रकारचे दस्तऐवज थेट ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार कोटी ३५ लाख ऑनलाइन अभिलेख डाउनलोड केले गेले. वैयक्तिकपणे शेतकऱ्याला स्वतः घरबसल्या १५ रुपये शुल्कात तर सार्वजनिक सेवा केंद्रात (सीएससी) २५ रुपये शुल्क भरून सात-बारा उतारा मिळातो.

Agriculture Land
Land Purchase: एक रुपयात जमीन मिळतेय, तरीही पुणे बाजार समितीचा ३०० कोटींचा अट्टहास का?

त्यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेरपाटे वाचत असून शासनालाही या शुल्कापोटी तब्बल ७६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ई-फेरफार व ई-महाभूमी प्रकल्प सुरू करण्यासाठी महसूल विभागाच्या यंत्रणेने पहिल्या टप्प्यात अनेक समस्यांना तोंड दिले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हेप्रकल्प राबविले पाहिजे, अशी भूमिका यंत्रणेने घेतली. या प्रकल्पांसाठी दशकभरात मिळालेले यश समाधानकारक आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Agriculture Land
Agriculture University Land: कृषी विद्यापीठांच्या ३५ हजार एकर जमिनी चारा लागवडीसाठी वापरणार!

ई-महाभूमी प्रकल्पामुळे डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा उतारा, खाते उतारा, फेरफार तसेच मिळकत पत्रिकादेखील ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा मिळाली आहे. शेती व अकृषक कामाकरिता वर्षभरात डाउनलोड केलेल्या डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा नकलांची संख्या तीन कोटी ३ लाख ७७ हजारांहून अधिक नोंदली गेली आहे.

याशिवाय नागरिकांनी ९६ लाख ५६ हजार डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे तर २० लाख ३१ हजार डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारे डाउनलोड केले आहेत. राज्याच्या काही भागांत डिजिटल स्वाक्षरीत मालमत्ता उतारे, अर्थात प्रॉपर्टी कार्डदेखील ऑनलाइन वाटू लागला आहे. वर्षभरात १५ लाख २१ हजारांहून अधिक मालमत्ता उतारे डाउनलोड केले आहेत.

पीकविमा, पीककर्ज, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार यामुळे सात-बारा उतारा काढण्याची संख्या राज्यभरात कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी घरबसल्या ऑनलाइन सात-बारा उपलब्ध होत असल्यामुळे महसूल यंत्रणेच्या डिजिटल प्रकल्पांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, माजी राज्य समन्वयक, ई-सात-बारा प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com