Water Scarcity : मोरणा धरणात २१ टक्के पाणीसाठा

Water Crisis : मोरणा धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून आणखी एक महिना कडक उन्हाळा आहे. सध्या धरणात २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून एकच आवर्तन कसेतरी होईल, अशी अवस्था आहे.
Water Crisis
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Sangli News : मोरणा धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून आणखी एक महिना कडक उन्हाळा आहे. सध्या धरणात २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून एकच आवर्तन कसेतरी होईल, अशी अवस्था आहे.

सांगली आणि वारणा पाटबंधारे दोन्ही विभागांनी योग्य नियोजन करून वाकुर्डे योजनेचे पाणी १५ जूनपर्यंत पुरेल एवढे पाणी तातडीने सोडावे, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत असून हे शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

पाऊसकाळ समाधानकारक झाल्याने, पाणी पुरेल या आशेने लाभक्षेत्रात ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा जाणवायला लागला असल्याने पाण्याचा उपसा वाढला आहे. परिणामी धरणातील पाणी झपाट्याने कमी व्हायला लागले आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून ‘वाकुर्डे’चे पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी असतानाही दोन्हीही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे.

Water Crisis
Marathwada Water Crisis : सिनाकोळेगाव २१ टक्क्यांवर; ‘विष्णुपुरीत’त ३४ टक्के पाणी

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाकुर्डे योजनेचे १५० एमसीएफटी पाणी मोरणा धरणात तातडीने सोडवे, अशी मागणी जोर धरत आहे. मोरणा धरणातील पाण्यावर जवळपास २० गावे व प्रामुख्याने शिराळा शहर व एमआयडीसी पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. खरीप हंगामानंतर ऊस लागणी होतात. बहुतांश शेतकऱ्यांनी लागणी केलेल्या आहेत. उसाच्या क्षेत्रात वाढही झालेली आहे.

Water Crisis
Marathwada Water Crisis: मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याच्या वल्गना कागदावरच

ऊसतोड झालेल्या खोडव्याला व रब्बीच्या पिकांना आजअखेर पाणी पुरले असले तरी सध्या धरणात असलेले पाणी १५ दिवस तरी मिळणार का नाही, अशी अवस्था झाली आहे. ७७६ एमसीएफटी क्षमता असलेला व ६१० एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा असणाऱ्या मोरणा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

५ हजार एकर अधिकृत पाणीपरवाना असताना या क्षेत्राला दुपटीने लाभ होत आहे. सध्या मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते, तर आठ दिवस बंद असे नियोजन होते. तरीही शेतीला १५ दिवसांनी सुद्धा आवर्तन आले नाही.

सांगली पाटबंधारे विभागाने मोरणा धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मागणी आलेली आहे. सध्या कापरी, कार्वे, ढगेवाडी व जक्राईवाडी परिसरात पाणी सुरू आहे. या विभागातील आवर्तन झाल्यानंतर मोरणा धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग, इस्लामपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com