Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या

India Mansoon Update : यंदा देशावर दुष्काळाचे सावट घोंगावत असतानाच सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या सरी दक्षिण अंदमानच्या सागरात बरसल्या आहेत.
Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या

Pune News : गेल्या वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला होता. यामुळे यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट पसरले होते. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनावरून अंदाज वर्तवताना तो ३१ मे पर्यंत देशाचे प्रवेश करेल असे सांगितले होते. यादरम्यान आता शेतकऱ्यांसह देशातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आली असून मान्सून पुढे सरकत आहे. दक्षिण अंदमानच्या सागरात मान्सूनच्या सरी बरसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर रविवारी (ता.१९) दिली आहे.

विभागाने मान्सूनच्या आगमानाबाबतची माहिती देताना मालदीव, कोमोरिनचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात पाऊस झाल्याचे म्हटले आहे. यासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात देखील मान्सून दाखल झाला असून निकोबार बेटांवर गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाल्याचेही विभागाने म्हटले आहे.

Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या
Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

दरम्यान याआधी हवामान खात्याने नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत अंदाज व्यक्त केला होता. तसेच देशात यंदा पावसासाठी हवामान परिस्थिती अनुकूल असल्याचे म्हटले होते. तर ३१ मे पर्यंत मान्सून दाखल होईल असेही म्हटले होते. यामुळे आता देशात १ जूनला दाखल होणारा मान्सून एक दिवसा आधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

आज रविवारी निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनचा पाऊस पडला. यामुळे राज्यासह देशात मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना लागली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ६ जूनपर्यंत तळ कोकणात आणि ७ जून पर्यंत पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या
Monsoon Update : मॉन्सून १९ मे रोजी अंदमानात येणार

चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी

यादरम्यान चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने रेकॉर्डब्रेक पाऊसाची नोंद झाली आहे. येथील अडरे गावच्या अनारी भागात फक्त अर्ध्या तासात झालेल्या पावसाने नद्यांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून अडरे गावच्या अनारी भागातून जाणारी नदी दुथडी भरुन वाहत आहे. तर मुसळधार पाऊसामुळे पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य वाहून गेले आहे.

तसेच चिपळूणमध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाबाबत हवामान विभागाकडून माहिती समोर आलेली नाही. मात्र याआधीच विभागाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. यादरम्यान चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तास पडलेल्या पावसाने येथे पाणीच पाणी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com