Agriculture Fertilizers : खते, विक्री, लिंकिंगवर नजर

State Agriculture Minister Dhananjay Munde : राज्यात कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे शुक्रवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon
Published on
Updated on

Beed News : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा शासन व बाजार स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

राज्यात कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे शुक्रवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिली.

Dhananjay Munde
Agriculture Input Center : जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी केंद्रांची झाडाझडती

राज्यात बोगस बियाणे, लिंकिंग, खत-बियांची चढ्या भावाने विक्री या विरोधातील ५ कृषी कायदे प्रस्तावित केल्यानंतर काही ठरावीक घटकांकडून राज्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई भासवली जात आहे.

Dhananjay Munde
Agriculture Fertilizers : मंजूर साठ्यापेक्षा कमी खतांचा पुरवठा, नॅनो युरियाची लिंकिंग

हा संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक केला जात असून, खतांची व बियांची कृत्रिम टंचाई भासवणे किंवा त्याआडून चढ्या भावाने विक्री करणे याबाबत धडक कारवाया करणे सुरू असल्याचेही श्री. मुंडे म्हणाले.

‘पुढील लढाईसाठी सज्ज व्हा...’

निवडणुकीत जय-पराजय होत असतात. पुढेही अनेक संधी येतील. मात्र निवडणुकीत पराभव झाला म्हणून विवंचना व नैराश्यातून काही कार्यकर्त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. हे आमच्या मनाला अत्यंत वेदना देणारे व आमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणारे आहे. ही काही शेवटची निवडणूक नाही, पण जीवन किंवा कुटुंब मात्र पुन्हा मिळत नाही, त्यामुळे या विवंचनेतून बाहेर पडून पुढील लढाईसाठी सज्ज होऊ, असे आवाहन श्री. मुंडे यांनी समर्थक कार्यकर्त्यांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com