Cotton Planting Technology : सघन लागवड तंत्रज्ञानाने कापूस उत्पादकतेमध्ये वाढ शक्य

Dr. Y G Prasad : मातीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर निवडून कपाशीची लागवड करावी, असे प्रतिपादन नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.
Dr. Y G Prasad
Dr. Y G Prasad Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : कोरडवाहू क्षेत्रामध्ये कापूस लागवड करताना सघन व अति सघन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादकतेमध्ये १५ ते २० टक्के वाढ होते. मातीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर निवडून कपाशीची लागवड करावी, असे प्रतिपादन नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था व परभणी येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त शुक्रवारी (ता.१२) परभणी येथे शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील प्रमुख पीक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यात विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Dr. Y G Prasad
Cotton Rate : अपेक्षित भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवलाय घरात

या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी कापूस लागवडीचे अतिसघन व सघन लागवड तंत्रज्ञान व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने शेतकरी मेळावा आयोजित केला होता.

अध्यक्षस्थानी लक्ष्मी देशमुख, कार्यक्रमाचे उद्‍घाटक म्हणून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रांत संघटनमंत्री (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) दादा लाड, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी, आय, डॉ. नीळकंठ हिरेमणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले उपस्थित होते.

Dr. Y G Prasad
Cotton Cultivation : कापूस घन लागवड लाभदायक

दादा लाड म्हणाले, की कापूस लागवडीसाठी योग्य अंतर, गळफांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्पादनात वाढ होईल.

या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यात कापूस अतिसघन व सघन कापूस लागवड आणि दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान या पद्धतीमध्ये उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या राजेंद्र सोनी, अशोक देशमाने, शिवाजी शिंदे, विठ्ठल गजमल, राजेंद्र मोगल, बाबासाहेब साबळे, बळीराम लाड यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विशेष कापूस प्रकल्पाचे समन्वयक अमित तुपे यांनी केले तर आभार श्रीधर पवार यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com