Onion Export Ban : केंद्राच्या निर्यात बंदीचा फायदा बड्या व्यापाऱ्यांनाच; रोहित पवार यांची सरकारवर टीका

Rohit Pawar On Onion export ban back : केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतला. तसेच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे. यावरून शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
Onion Export Ban
Onion Export BanAgrowon

Pune News : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने आज रविवार (१८ रोजी) निर्णय घेतला. तसेच या समितीने ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास देखील मान्यता दिली आहे. यावरून शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणासह सरकारच्या धोरणांमुळे अचडणीत सापडा आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले होते. मात्र जो कांदा शेतकऱ्यांनी वाचवला. तो बाजारात नेला. मात्र त्याच्या हातात चार मिळत असतानाच केंद्राने डिसेंबर २०२३ मध्ये कांदा निर्यात बंदी केली. तसेच ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्याती बंदी राहील असे घोषीत केले.

Onion Export Ban
Onion Export Ban : अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली; ३ लाख मेट्रिक टनाची मर्यादा

आमदार रोहित पवार

यानंतर आज लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने आज घातलेली बंदी उठवली. यावरून आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी, जेंव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याला चार पैसे मिळत होते. तेंव्हा केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि मग अडलेल्या शेतकऱ्याने कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर ही निर्यात बंदी हटवल्याचे म्हटले आहे.

तसेच ही निर्यात बंदी काही शेतकऱ्यांचा कळवळा आल्याने उठवली नाही. तर उद्याच्या लोकसभा निवडणुकीत रडण्याची वेळ येऊ नये म्हणून उठवली आणि तसा निर्णय घेतल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Onion Export Ban
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी मागे घ्या

बड्या व्यापाऱ्यांनाच फायदा

पण आता या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही तर शेतकऱ्यांकडून मातीमोल भावात कांदा घेऊन साठवून ठेवलेल्या बड्या व्यापाऱ्यांनाच या निर्णयाचा फायदा होणार असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर हा निर्णय म्हणजे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांच्या समितीने घेतला निर्णय

कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केल्या दोन एक महिन्यापासून राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांकडून होत होत. मात्र फक्त व्यापारी आणि उद्योगपतींच्या हितासाठी सरकारकडून निर्णय घेतला जात नव्हता. पण आता देशात लोकसभेच्या निवडणूका होत आहेत. शेतकरी वर्ग नाराज होऊ नये म्हणून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने हा निर्णय घेतला. तसेच या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com