Farmers Issue : ‘कृषी’च्या कामकाजावर आमदार चिखलीकरांची नाराजी

Agriculture Department : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या कंधार तालुका कृषी अधिकारी व लोहा तालुका कृषी अधिकाऱ्यांना कसलीच माहिती नाही
MLA Pratap Patil-Chikhalikar
MLA Pratap Patil-ChikhalikarAgrowon
Published on
Updated on

Nanded News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या कंधार तालुका कृषी अधिकारी व लोहा तालुका कृषी अधिकाऱ्यांना कसलीच माहिती नाही. शेतकऱ्यांनी साधे-साधे प्रश्‍न विचारले तर त्याला वेगळ्या वळणार नेण्याचा प्रयत्न केला जातो, अशी कानउघाडणी करत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नाराजी व्यक्त केली.

लोहा येथे शुक्रवारी (ता. २३) तालुकास्तरीय खरीप हंगाम २०२५-२६ पूर्व बैठक झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार गोरे, प्रवीण पाटील चिखलीकर, कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. पाटील, माणिकराव मुकदम, कल्याण सूर्यवंशी, आनंदराव पाटील ढाकणीकर, दत्ता वाले, करीम शेख, बंडू वडजे, प्रल्हाद फाजगे, दत्तराव गायकवाड, विनोद बेंद्रीकर यांच्यासह प्रयोगशील शेतकरी रामराव पवार, रत्नाकर ढगे आदी उपस्थित होते.

MLA Pratap Patil-Chikhalikar
Kharif Sowing : गेवराईत यंदा सव्वा लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित

आढावा बैठकीच्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून कोणतेही काम होत नसल्याचा आरोप केला. या वेळी आमदार चिखलीकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरत यापुढील बैठकीत असे चालणार नाही, असे बजावले.

MLA Pratap Patil-Chikhalikar
Kharif Season: राज्यात ३९५ भरारी पथके

कंधार व लोहा तालुक्यांत बियाणे व खतांचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध करव्यात. बियाणे व खतांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा, कृषी सोलर पंप, पीकविमा आदी योजनांचा लाभ घरोघरी पोहोचवण्याच्या ही सूचना या वेळी संबंधितास देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com