Pimpalgaon Market Committee : पिंपळगाव बाजार समितीवर आमदार बनकर यांची सत्ता

Nashik Market Committee Update : नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीपराव बनकर, तर उपसभापतिपदी जगन्नाथ कुटे यांची निवड झाली.
Pimpalgaon Market Committee
Pimpalgaon Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Nashik APMC News : नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीपराव बनकर, तर उपसभापतिपदी जगन्नाथ कुटे यांची निवड झाली.

चुरशीच्या निवडणुकीत तब्बल २३ वर्षे बनकर यांनी सत्ता कायम ठेवत चौथ्यांदाही बहुमत मिळवत बाजार समितीची सत्ता काबीज केली. तर बहुचर्चित नाशिक बाजार समितीवर सभापतिपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतिपदी उत्तम खांडबहाले यांना संधी मिळाली आहे.

पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बनकर यांनी १८ पैकी ११ जागा मिळविल्या, तर माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल ६ जागा मिळाल्या तर अपक्ष यतीन कदम यांनी बाजी मारली आहे.

त्यानुसार शनिवार (ता. २७) रोजी सभापती व उपसभापती निवडणूक पार पडली सभापती उपसभापती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभापतिपदी आमदार दिलीप बनकर व गोकूळ गिते यांनी अर्ज सादर केला आमदार बनकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून दीपक बोरस्ते, तर अनुमोदक म्हणून सोहनलाल भंडारी होते.

Pimpalgaon Market Committee
Nashik Market Committee Update : बाजार समित्यांत ‘झेडपी’च्या माजी सदस्यांचाही प्रवेश

तर गोकूळ गिते यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी आमदार अनिल कदम, तर अनुमोदक म्हणून प्रल्हाद डेर्ले होते. मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आमदार बनकर यांना ११ मते, तर गोकूळ गिते यांना ६ मते मिळाली. त्यानुसार सभापतिपदी आमदार बनकर यांची निवड जाहीर करण्यात आली तर उपसभापती पदासाठी जगनाथ कुटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापतिपदी निवड जाहीर करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सविता शेळके यांनी कामकाज पाहिले. अपक्ष उमेदवार यतीन कदम हे निवडणूक प्रकियेत तटस्थ राहणे पसंत केले.

याप्रसंगी संचालक माजी आमदार अनिल कदम, दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, गोकूळ गिते, दिलीप मोरे, प्रल्हाद डेर्ले, ज्ञानेश्‍वर शिरसाट, शिरीष गडाख, यतीन कदम, राजेश पाटील, अमृता पवार, मनीषा खालकर, नंदू गांगुर्डे, सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे आदी संचालक उपस्थित होते.

नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी बाजी मारली. तर उपसभापतिपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवाजी चुंभळे यांच्या गटाने निवडणुकीत भाग न घेतल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या. बाजार समितीची निवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत आली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंगळे गटाने १२ जागा मिळविल्या होत्या. शिवाजी चुंभळे गटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले हेाते. त्यानंतर नियमानुसार सभापती आणि उपसभापती निवडणूक होणे, अपेक्षित होते. पण या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती.

Pimpalgaon Market Committee
Nashik Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणूक प्रचारावरून आमदाराला धमकी

त्यानंतर नवनिर्वाचित संचालकांना अपात्र ठरवण्याची कार्यवाहीही मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती. पण, पिंगळे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

सभापती आणि उपसभापतींच्या पदाच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी जाहीर केले. त्यानुसार खासदार देविदास पिंगळे यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी उत्तम खांडबहाले हे विराजमान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com