Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेत घोटाळा? थेट बच्चू कडू यांनी व्यक्त केली शक्यता

Bachchu Kadu On Pm Kisan Yojana : महायुतीचे सहकारी असणारे आमदार बच्चू कडू यांनी आता थेट पीएम किसान योजनेवर बोट ठेवले आहे. यावेळी त्यांनी या योजनेवरून प्रश्न चिन्ह उपस्थित करताना यात घोटाळ्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Bachchu Kadu
Bachchu kaduAgrowon

Pune News : प्रहारक संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावरून ते सध्या चर्चेत असतानाच आता थेट त्यांनी पीएम किसान योजनेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. कडू यांनी यावेळी पीएम किसान योजनेत घोटाळ्याची शक्यता असून राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसान योजनेचा पैसा दुसऱ्या राज्यात जातोच कसा असा? सवाल उपस्थित केला आहे. यामुळे राज्यात सध्या उलट सुटल चर्चा रंगल्या आहे.

पीएम किसान योजनेत घोटाळ्याची शक्यता व्यक्त करताना कडू यांनी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ८२ शेतकऱ्यांचा हवाला दिला आहे. तसेच कडू यांनी, या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे जम्मू-कश्मीरला गेल्याचे म्हणताना ते गेलेच कसे असा सवाल केला आहे.

Bachchu Kadu
PM Kisan Yojana : तुम्ही तर या चुका नाही करत ना…अन्यथा अडकू शकतो तुमचा हप्ता

कडू काय म्हणाले?

याबाबत संबंधीत शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासून तक्रार करूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत. तर या तक्रारीनंतर कोणत्याही अधिकाऱ्यांने त्यांच्या तक्रारीचे निवारण केलेले नाही. ते पैसे या शेतकऱ्यांना का मिळालेले नाहीत असाही सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही या शेतकऱ्यांच्या पैसे परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करू. गरज पडल्यास किंवा तशी वेळ आल्यास विधानसभेत सभागृहात देखील आवाज उठवू असे कडू यांनी म्हटले आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

काय आहे प्रकरण

अमरावती जिल्हा अचलपूर तालुक्यातील शहापूर येथील ८२ शेतकऱ्यांना अद्याप पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांना मिळणारा मोबदला थेट जम्मू-कश्मीरमधील शहापूरला ट्रान्सफर झाला. यावरून संबंधीत शेतकऱ्यांनी चौकशी केली असता त्यांनी उत्तर मिळाले नाही. यानंतर याची माहिती कडू यांनी मिळाली. त्यांनी याबाबत घेतली असता त्यांना मिळणारे पैसे हे जम्मू-कश्मीरमधील शहापूरला ट्रान्सफर होत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. यावरून सध्या राज्यातील वातारण ढवळण्याची शक्यता आहे.

कडू यांचा सचिन तेंडुलकर यांना इशारा

दरम्यान ऑनलाइन रमी प्रकरणातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. यावरून तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी अथवा भारतरत्न पुरस्कार परत करावा अशी मागणी कडू यांनी केली होती. तसेच तेंडुलकर यांनी या दोन पर्यांपेकी कोणताही निर्णय न घेतल्यास ६ जून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इसारा कडू यांनी दिला आहे.

(सोर्स एबीपी माझा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com