Miyawaki Forest : कृषी महाविद्यालयात चार एकरांवर मियावाकी जंगल

Tree Plantation : पर्यावरण संतुलनासाठी वननीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ क्षेत्र वनाच्छित असणे आवश्यक आहे. या प्रमाणात जिल्ह्याचे वनक्षेत्र दीड टक्काच आहे.
miyawaki forest
miyawaki forestAgrowon

Latur News : पर्यावरण संतुलनासाठी वननीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ क्षेत्र वनाच्छित असणे आवश्यक आहे. या प्रमाणात जिल्ह्याचे वनक्षेत्र दीड टक्काच आहे. यामुळे वनक्षेत्राचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न नियमित सुरू असतात.

याला यंदा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी चालना दिली असून वनक्षेत्राच्या वाढीसाठी त्यांनी शासकीय कार्यालयाच्या मोकळ्या जागांना प्राध्यान्य दिले आहे. यातूनच येथील कृषी महाविद्यालयाच्या चार एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मियावाकी स्वरूपाची घनदाट वृक्ष लागवड (जंगल) साकारले जाणार आहे.

miyawaki forest
Miyawaki Forest : मियावाकी जंगलाची सिंदखेडमध्ये उभारणी

जागतिक पर्यावरण दिनी (ता. पाच) जिल्हाधिकारी ठाकूर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून मियावाकीचा प्रारंभ झाला.

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिव्याख्याता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

miyawaki forest
Miyawaki Forest : शिरगावात ‘मेया वाकी’ प्रकल्पातून वृक्ष लागवड

चार एकरावर सुमारे ४८ हजार झाडे लावली जाणार आहेत. मियावाकी पद्धतीने साकारण्यात येणाऱ्या या जंगलात प्रति चौरस मीटरमध्ये तीन वृक्ष लावले जातील. यामध्ये विविध पाचशे प्रजातींच्या वृक्षांचा समावेश राहील. या कामाला पर्यावरण दिनापासून सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात एक एकर परिसरात वृक्षारोपणाची पूर्वतयारी करण्यात आल्याचे डॉ. ठोंबरे यांनी सांगितले.

मोकळ्या जागी वृक्ष लागवड करा

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नाते थेट निसर्गाशी असते. शेतीशी निगडित असणारा अभ्यास हा निसर्गाशी निगडित असतो. कोणत्या वृक्षाची वाढ कशी होईल, कोणत्या जमिनीवर कोणते झाड जगेल, याबाबत कृषी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक चांगली माहिती असते. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनव संकल्पना वापरून, अभ्यासाचा उपयोग करून वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केले. महाविद्यालयात एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम राबवून जबाबदारी घेऊन वृक्ष संगोपन करण्याची सूचना सागर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com