Gram Panchayat Election : बुलडाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र

Buldana Gram Panchayat Election : जिल्ह्यात सर्वात चर्चेची जामोद ग्रामपंचायतीची निवडणूक होती. या ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

Buldana News : जिल्‍ह्यात ४८ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी रविवारी (ता.५) मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे, जयरमगड, रोहणा, अटाळी, घारोड, माटरगाव गेरू या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर लोणी गुरव, टाकळी, माक्‍ता या गावांमध्ये ३ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक पार पडली.

बुलडाणा जिल्ह्यात महायुतीचा २३ ग्रामपंचायती, महाविकास आघाडीचा १४ ग्रामपंचायती, तर स्थानिक आघाड्यांचा ११ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. जिल्ह्यात सर्वात चर्चेची जामोद ग्रामपंचायतीची निवडणूक होती. या ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. ही ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप चे आमदार डॉ. संजय कुटे यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : एक हजार ९३२ ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य मतपेटीत

जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या त्यापैकी दोन ग्रामपंचायतीया काँग्रेसने जिंकल्या आहेत तर एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीने जिंकली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिंदे गटाचाही दबदबा राहिला आहे. बुलडाणा आणि मेहकर तालुक्यात शिंदे गटाने अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला आहे. तर जिल्ह्यात काँग्रेसनेही मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला जात आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाचे वर्चस्व

तर, सोमवारी (ता.६) सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये अटाळी ग्रामपंचायत सरपंचपदी दुर्गा हरीश काटोले, घारोड सरपंचपदी वैभव ठाकरे मते ७१६, जयपूर लांडे सरपंचपदी भारती गोपाल लांडे, जयरामगड सरपंचपदी वनिता सुनील जाधव, माटरगाव गेरू सरपंचपदी गोकर्ण अशोक, रोहणा येथे सरपंचपदी सविता संतोष जगताप आदी विजयी झाले आहेत. विजय मिळवल्‍यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्‍थानिक टॉवर चौक येथे जल्‍लोष करण्यात आला.

जानेवारी व फेब्रुवारी २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करून आचारसंहिता लागू केली होती. १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रकिया पार पडली.

२३ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी पार पडल्‍यानंतर प्रत्‍यक्ष २६ ते ४ तारखेपर्यंत प्रचाराचा धुराळा उडाला. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ग्रामस्‍थांनी गावकारभारी निवडण्यासाठी मतदान केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com