Rajaram Sakhar Kolhapur : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढ करण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतलेल्या पोटनियम दुरुस्तीची सुनावणी पूर्ण झाली आहे. कार्यक्षेत्र वाढीला राजारामबापू कारखान्याने वाळवा (जि. सांगली) तालुक्यातील, भोगावती, बिद्री, वारणा कारखान्याने विविध तालुक्यातील कार्यक्षेत्र वाढीवर हरकत घेतली होती. दरम्यान, या सुनावणीचा अंतिम निकाल आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढीबाबत ठराव मंजूर केला होता. दरम्यान, राजाराम कारखाना कोल्हापूर जिल्ह्यातील सभासदांचा आहे तर सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र कशासाठी वाढवता, असा सवाल करत सतेज पाटील गटाने विरोध केला होता. तशी हरकतही घेतली होती.
वाळवा तालुक्यातील १३ गावांसह करवीर, हातकणंगले तालुक्यातील गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा ठराव केला होता. आमदार पाटील यांनी वाळवा तालुक्यातील तेरा गावांवर व तीन वर्षे ऊसपुरवठा न करणाऱ्या, सभेला उपस्थित न राहणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या ठरावाला प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे हरकत घेतली होती.
'राजारामबापू' कारखान्याने वाळवा तालुक्यातील, भोगावती आणि बिद्री कारखान्याने करवीर तालुक्यातील आणि 'वारणा'ने हातकणंगले कार्यक्षेत्रातील गावांवर हरकत घेतली होती. प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे यांच्यासमोर आज सुनावणी पूर्ण झाली. आठ ते नऊ दिवसांत या सुनावणीचा निकाल जाहीर करणार असल्याचे मावळे यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून अॅड. केदार लाड, पंडित अतिने, योगेशे तेली, प्रबोध पाटील, तर 'राजाराम' कारखान्याच्या वतीने अॅड. लुईस शहा व 'राजारामबापू', 'वारणा' कारखान्याच्या वतीने अॅड. अभिजित कापसे यांनी सुनावणीत सहभाग घेतला.
छत्रपती राजाराम साखर कारखानाच्या वाढीव कार्यक्षेत्रासह पोटनियम GG दुरुस्तीची सुनावणी आज पूर्ण झाली. यासंदर्भातील सर्व हकरती कागदपत्रे घेतली आहेत. याचा निकाल आठवड्यात जाहीर केला जाईल. - जी. जी. मावळे, प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.