Gulabrao Patil : केळीसह उसाला फळाचा दर्जा आणि उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेची मागणी केंद्राकडे करणार : गुलाबराव पाटील

North Maharashtra Corporation : केळी पीकाला फळाचा दर्जा मिळावा यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाब पाटील यांच्या प्रयत्नांना २०२३ मध्ये यश आले होते. यावेळी राज्य सरकारने फळबाग लावगड योजनेतंर्गत केळीला फळाचा दर्जा दिला होता. यानंतर आता गुलाब पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेसाठी कंबर कसली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilAgrowon

Pune News : दोन एक वर्षाच्या आधी माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांच्या केळी महामंडळ स्थापनेचे स्वप्न पूर्ण करताना राज्य सरकारने केळी महामंडळ स्थापन केले होते. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाब पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. तसेच महामंडळाला १०० कोटींची तरतूद केल्याचे म्हटले होते. यानंतर राज्याने फळबाग लावगड योजनेतंर्गत केळीला फळाचा दर्जा दिला होता. मात्र याला अद्यापही केद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही. तसेच गेल्या अनेक वर्षापासून उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेसाठी असलेल्या मागणीला देखील केंद्राने केराची टोपली दाखवली आहे. यावरून मंत्री गुलाब पाटील यांनी आम्ही प्रयत्न करणार असून आमचे सरकार येताच आमचे खासदार महामंडळासाठी प्रस्ताव केंद्राला सादर करतील असे म्हटले आहे. त्यांनी ही माहिती रविवारी (ता.१२) एएनआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलातीत दिली आहे.

यावेळी मंत्री गुलाब पाटील म्हणाले, 'जळगावसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रश्न गंभीर आहे. यामुळे केंद्र सरकारने खानदेशाच्या कृषी सिंचनाचा अनुशेष भरून काढायला हवा. कृषी सिंचनासाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांमध्ये जळगावसाठी देखील योजना असायला हव्यात. जर अशा योजना अंमलात आल्या असत्या तर आता दुष्काळाच्या स्थितीत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर मार्गी लागणार : गुलाबराव पाटील

तसेच जळगाव पट्टा हा केळी आणि उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यातील उस आणि केळीला फळाचा दर्जा देण्यात यावा, अशी आमची जूनी मागणी आहे. याप्रमाणे केळी आणि उसाला फळाचा दर्जा केंद्राने द्यावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाब पाटील म्हणाले.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : खरिप हंगाम वाचवण्यासाठी, राज्यात कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग

राज्यासह देशात जसी इतर महामंडळे आहेत. तसेच खाणदेशासाठी उत्तर महाराष्ट्र महामंडळ असावे अशी आमची जूनी मागणी आहे. यावर अद्यापही केंद्र सरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही. यासाठी आम्ही नव्याने येणाऱ्या सरकारकडे महामंडळाच्या स्थापनेची मागणी करणार आहोत. सध्या उत्तर महाराष्ट्र महामंडळास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र अद्याप यावर केंद्राच्या पातळीवर निर्णय झालेला नाही अशी खंत मंत्री गुलाब पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच मराठा महामंडळ आणि कोकण महामंडळास जसा निधी येतो तसाच निधी खाणदेशात महामंडळाच्या स्थापनेनंतर येईल. खाणदेशातून ५६ आमदार निवडणून येतात. यामुळे खाणदेशातील उत्तर महाराष्ट्र महामंडळाच्या मान्यतेसाठी आमच्या खासदारांनी केंद्रात भाजपचे सरकार येताच मागणी करावी. ही विनंती आमच्या खासदारांना करणार असल्याचेही मंत्री गुलाब पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com