
नाशिक : १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत सिन्नर येथे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून ‘श्रीअन्न निरंतर’ मिलेट फेस्टिव्हल-२०२५ पार पडला. या महोत्सवात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १० सामंजस्य करार करण्यात आले.
खरेदीदार व विक्रेता मेळाव्यात मिलीगेंस, वसुंधरा ऑरगॅनिक परिवार, ए. बी. गृहउद्योग, रहेजा ग्रुप, सर्वज्ञ फूड्स, अश्विनी टांकसाळे असे ९ खरेदीदार तर अकोले येथील कळसुबाई शेतकरी उत्पादक कंपनी, घोटी येथील सेंद्रिय शेतकरी मित्र कंपनी, वुमन्स पॉवर कंपनी, महिला बचत गट, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्माण केलेल्या विविध उत्पादनसंबंधित १७ उद्योजक उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पौष्टिक मालाला प्रथमच मोठी मागणी नोंदवली गेली. ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांच्या पौष्टिक मालाला मागणी वाढत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.
संमेलनाच्या सुरुवातीला उपस्थित खरेदीदार यांनी खरेदी करावयाच्या वस्तूंची माहिती व स्वतःचा परिचय करण्यात आला. त्यानंतर उपस्थित विक्रेते यांच्याकडील उत्पादित मालाची खरेदीदारांना माहिती व परिचय करण्यात आला. मिलेट उत्पादक शेतकरी व खरेदीदार यांच्यामध्ये राऊंड टेबलवर राऊंड टेबलवर मिलेट प्रतवारी, पॅकिंग, दराबाबत चर्चा घडवून आणण्यात आली.
या वेळी नाशिक येथील वैभव भावसार यांनी मार्केटिंग, ब्रॉन्डिंग पॅकेजिंगबाबत उपस्थित शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट, उद्योजक यांना सविस्तर माहिती दिली. खरेदीदार विक्रेता संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे वरुण पाटील, तंत्र अधिकारी महेश वेठेकर, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या उत्पादनांचे झाले करार
कांदा करप, निर्जलीकरण केलेली फळे, भाजीपाला, मिरची पावडर, मसाले, मिलेट उत्पादित कुकीज याच्या खरेदीत १० सामंजस्य करार करण्यात आले. वर्षभर शेतकरी कपन्यांकडून माल खरेदी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सहा करार झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.