Milk Rate : खरेदीदरात घसरणीने दूध उत्पादक अडचणीत

Dairy Farmer : दूध खरेदीचे दर पुन्हा दोन रुपयांनी घसरल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत.
Milk Rate
Milk RateAgrowon

Solapur News : दूध खरेदीचे दर पुन्हा दोन रुपयांनी घसरल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत. कमीत कमी खर्चामध्ये पशुपालन करण्याचे तंत्र आता शेतकऱ्यांनी अवगत करण्याची गरज आहे. अनेक आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळाली नाही. गेल्या वर्षी ३४ रुपये दराने घेतले जाणारे दूध सध्या २५ रुपयांपर्यंत घसरले आहे.

आठ दिवसांपूर्वी प्रतिलिटर ५० पैशांनी तर पुन्हा चार दिवसांपूर्वी प्रति लिटर दीड रुपये दराने दुधाचे दर कमी करण्यात आले आहे. यामुळे मुळातच कमी झालेल्या दरात आणखीन घट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कमीत कमी खर्चात पशुपालन करून दूध उत्पादन करण्याचे तंत्र न वापरल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे.

Milk Rate
Cow Milk Rate : गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

पशुधन वाचवण्यासाठी आणि गोटे टिकविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. यासाठी पशुखाद्यावरील खर्च कमी करणे, मुक्त गोट्याचा अवलंब करून देखभाली वरचा खर्च कमी करणे आवश्यक आहे.

कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रसिद्ध दुग्धोत्पादक शिवानंद (तात्या) व्होनमुटे यांच्या अनुभवानुसार एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन गाय) या संकरित गायीऐवजी जर्सी गाय शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर आहे. जर्सी गाय सांभाळताना येणारा वैद्यकीय खर्च कमी आहे.

असे बनवा घरीच पशुखाद्य

डेअरीकडून पशुखाद्य घेण्याऐवजी घरच्या घरी ते तयार करता येते. यासाठी गहू भुसा, हरभरा कळना, चुणी (रवा मैदा बनवताना राहिलेले वेस्टेज) सूर्यफूल, सरकी पेंड, साळीची तांब तसेच मिनरल पावडर, मक्याचा भरडा याचे योग्य प्रमाणात मिश्रण करून घरच्या घरी पशुखाद्य तयार केल्यास प्रति किलो फक्त २३ रुपये खर्च येतो.

Milk Rate
Cow Milk Rate : महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?

पशुखाद्याचे दर वाढलेलेच

दुधाला चांगला भाव मिळत होता तेव्हा पशुखाद्याच्या किमती प्रचंड वाढविण्यात आल्या होत्या. दुधाला दर चांगला मिळत असल्याने शेतकरी वाढीव दरानेही पशुखाद्य खरेदी करत होते. मात्र, आता प्रतिलिटर १० रुपयांनी दुधाचे दर कमी होऊन देखील पशुखाद्याचे दर एक रुपयानेही कमी झालेले नाहीत. या उलट ते वरचेवर वाढतच आहेत.

आकडे बोलतात

मक्याची वैरण प्रति किलो खर्च ३ ते ४ रुपये

ज्वारी, बाजरी कडवळ प्रति किलो १.५० पैसे

कंपनीचे तयार पशुखाद्य प्रति किलो ३५ ते ३७ रुपये

घरीच पशुखाद्य बनवल्यास प्रति किलो २३ ते २५ रुपये

ठळक बाबी

५० दिवसांपेक्षा अधिक भाकड काळ नसावा

प्रत्येक वर्षी गाईचे वेत होणे आवश्यक

औषधोपचारावरील खर्च कमी होणे आवश्यक

यासाठी मुक्त गोठा, स्वच्छ पाणी आवश्यक

वैराणीसह पशुखाद्य घरीच तयार करणे गरजेचे

वैरणीत मकाऐवजी कडवळाचा वापर करावा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com