Cow Milk Rate : महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?

Vijay Vadettiwar : दूध अनुदानाबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
Cow Milk Rate
Cow Milk Rateagrowon
Published on
Updated on

Cow Milk Subsidy Maharashtra : राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्या अटी शर्थी पार करण्यासाठी नाकात दम येण्याची शक्यता आहे. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

वडेट्टीवार म्हणाले की, पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा राज्य सरकारचा ५ जानेवारी २०२४ला जाहीर केलेला निर्णय केवळ एक महिन्यासाठी आहे. या योजनेसाठी सरकारने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ कालावधी जाहीर केला. शिवाय हे अनुदान फक्त गायीच्या दुधासाठी दिले जाणार आहे.

या अनुदानाचा लाभ म्हशीच्या दुधासाठी मिळणार नाही. दरम्यान हे तुटपुंजे अनुदान मिळवायचे असेल तर बारा नियमांची लांबलचक यादी दिली. सरकारचे तुटपुंजे पाच रुपयांचे अनुदान घेण्यासाठी या बारा भानगडी कशासाठी असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थीत केला आहे.

योजनेमुळे दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी झाले. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ कधीकाळी दुधाला सर्वाधिक दर देण्यासाठी ओळखला जात होता. शासन निर्णय जाहीर होण्यापूर्वीपर्यंत भंडारा जिल्हा दुग्ध संघ गायीच्या दुधासाठी प्रती लिटर ३४ रुपयांचा दर देत होते. पण, ५ जानेवारीचा शासन निर्णय आला आणि या दुग्ध संघानेही दर २७ रुपयांवर आणले. शेतकऱ्यांना लिटरमागे सात रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

Cow Milk Rate
Milk Subsidy : प्रतिलिटर ५ रुपये दूध अनुदानासाठी अर्जप्रक्रिया सुरू

महिनाभराच्या अनुदानासाठी सरकारने या शेतकऱ्यांचे हक्काचे लिटरमागे सात रुपये हिरावले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे दर प्रामुख्याने मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी आणि बटरच्या दरावर अवलंबून असतात. हे दर कोसळले की दुधाचे दरही कोसळतात.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी सरकार विशेष परिस्थितीत हस्तेक्षप करते, असे सरकारी निर्णय सांगते. वास्तव मात्र वेगळेच आहे. दुधाचे दर पाडण्यासाठी हे सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप श्री. वडेट्टीवार यांनी केला.

तुटपुंज्या अनुदानासाठी १२ अटी कशासाठी

१) अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणे बंधनकारक राहील.

२) डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल. त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्धविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी.

३) अनुदानाची रक्कम समान तीन हफ्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

४) योजनेत सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी दुध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. त्याची प्रत दुग्ध विकास आयुक्तांना सादर करण्यात यावी.

५) दुग्ध विकास आयुक्तांनी याची शहानिशा करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायगी करावी.

६) योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी दुग्धविकास आयुक्त आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील.

७) योजनेत कुठल्याही सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल.

८) सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधाला लागू राहणार नाही.

९) ही योजना फक्त राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील.

१०) शेतकऱ्यांनी त्यांच्या दुधाळ जनावरांची नोंदणी पशुधन पोर्टलवर करावी.

११) शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची, पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करावी.

१२) या अटी, शर्तींची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com