Milk Powder : उत्पादकता खर्चापेक्षाही कमी दरात होते दूध पावडरची विक्री

Dairy Production : खासगी दूध कंपन्यांची वाढती स्पर्धा असतानाही भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा विदर्भातील एकमेव दूध अस्तित्व राखण्यात यशस्वी ठरला आहे.
Milk Powder
Milk PowderAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : खासगी दूध कंपन्यांची वाढती स्पर्धा असतानाही भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा विदर्भातील एकमेव दूध अस्तित्व राखण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र केंद्र शासनाने दूध पावडर आयातीचा निर्णय घेतल्यानंतर आधीच उत्पादकता खर्चापेक्षा कमी दराने दूध पावडर विकावी लागणाऱ्या या संघासमोरील अडचणीत वाढीची शक्‍यता वर्तविली जात आहे. दूधदरावर याचा परिणाम होण्याची शक्‍यता मात्र कमी असल्याचे सांगण्यात आले.

Milk Powder
Milk Powder Import : दूध संघाबरोबर उत्पादकांचेही अर्थकारण बिघडणार

चाऱ्याची अनुपलब्धता व त्यामुळे सातत्याने कमी होणारे गोधन याच्या परिणामी भंडारा वगळता विदर्भातील सर्वच दूध संघाचे अस्तित्व संपुष्टात आले. विदर्भात भंडार जिल्ह्यातच दूध संघ अस्तित्व कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. सुरुवातीच्या काळात या दूध संघाचे संकलन दोन लाख लिटरपेक्षा अधिक होते.

मात्र नजीकच्या काळात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून दुधाची खरेदी वाढली आहे. तब्बल १९ पेक्षा जास्त कंपन्या भंडारा जिल्हयात दुधाची खरेदी करतात. त्यामुळे दूध संघाकडील संकलन हे काही लाखांवरून अवघ्या ४४ हजार लिटरवर आले आहे. खरेदी केलेल्या या दुधाचा पुरवठा ‘अमूल’ला केला जातो, असे संघाच्या सूत्रांनी सांगितले. अतिरिक्‍त दुधापासून ८० ते ९० टन पावडर तयार करून त्याचा पुरवठा खासगी ट्रेडरला होतो.

Milk Powder
Milk Powder : धोरण केंद्राचं मरण शेतकऱ्यांचं; दूध संघांमध्ये हजारो टन दूध पावडर पडून, दूध दरावर थेट परिणाम

त्याकरिता निविदा प्रकाशित केली जाते. दूध पावडरचा उत्पादकता खर्च २४० ते २४५ रुपये असताना मागणी अभावी उत्पादकता खर्चापेक्षा कमी दराने म्हणजे २०० रुपये प्रमाणे पावडर विकावी लागते, अशी खंत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. संघाच्या दुग्धशाळेची क्षमता दीड लाख लिटर प्रति दिवस, तर पावडर प्लांटची क्षमता साडेसात टन प्रती दिवस अशी आहे.

दुधाचा दर असा...

केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे. त्याचा देशांतर्गत दुग्ध व्यवसायाला फटका बसणार आहे. सद्या भंडारा दूध संघाकडून गायीच्या दुधाला २८ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४४.५० रुपये असा दर दिला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com