Schemes for Farmers : दूधाळ गाई, शेळ्या-मेंढी गटाचा मिळणार लाभ ; पशुसंवर्धन विभागाकडून अर्ज करण्याचे आवाहन

Animal Husbandry Scheme : राज्यातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या असून, त्यातून दूधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे
Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department
Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या असून, त्यातून दूधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department
Lumpy Affected Animal : लम्पीने लाखो रुपये किंमतीची जनावरे दगावली, पशुसंवर्धन विभाग करतोय काय?

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांअंतर्गत दुधाळ गायी, म्हशींचे वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपणासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व २५ आधिक ३ तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालाकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड कण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Nandurbar: Appeal to submit application for the scheme of Animal Husbandry Department
Lumpy Virus : युद्धपातळीवर लसीकरण करा ; पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांच्या सूचना

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर लाभ मिळाला नाही, तर त्या लाभार्थीला दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशु पालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय, सर्व चिकात्सालय अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल. नरळे यांनी केले.

इथे करा अर्ज

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ-http://ah.mahabms.com किंवा अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव –AH-MAHABMS ( गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) यावरही अर्ज करता येईल. या योजनेसाठी ९ नोव्हेंबर २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत अर्ज करता येईल. तसेच टोल फ्री क्रमांक– १९६२ किंवा १८००२३३०४१८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com