Agriculture Scam : संघटित गैरव्यवहाराला कृषी अधिकाऱ्यांची मूक संमती

Micro Irrigation Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावात सूक्ष्मसिंचन संच बसविण्याच्या नावाखाली कृषी पर्यवेक्षक, वितरकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून शासनाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.
Micro Irrigation
Micro IrrigationAgrowon
Published on
Updated on

Nanded News : सूक्ष्मसिंचन संच बसविण्यात मुखेड, कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यात झालेल्या गैरव्यवहारास संबंधित मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी, त्या काळातील तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी संच तपासणीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

त्यामुळे या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. यामुळे यात आखणी १२ ते १५ अधिकारी गोवण्याची शक्यता आहे. संघटित पद्धतीने केलेल्या या गैरव्यवहारात अनेकांनी हात ओले करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावात सूक्ष्मसिंचन संच बसविण्याच्या नावाखाली कृषी पर्यवेक्षक, वितरकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून शासनाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात १० कृषी पर्यवेक्षकांसह एक मंडळ कृषी अधिकारी व तीन वितरक दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

Micro Irrigation
Micro Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचन अनुदान रखडल्याने शेतकरी लाभापासून वंचित

परंतु हे संच बसविल्यानंतर मोका तपासणीचे अधिकार असणारे संबंधित मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करून संच तपासले नाहीत, यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराला वाव मिळाल्याचे दिसून आले.

Micro Irrigation
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनात गरज आमूलाग्र बदलाची

यासोबतच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी साठा नोंदवही प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा संघटित गैरव्यवहाराचा प्रकार झाल्याचे नमूद केले आहे. चौकशी अहवालावरून विभागीय कृषी सहसंचालकांनी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीची शिफारस केली आहे. यामुळे यात आता आखणी १५ अधिकाऱ्यांची भर पडण्याची शक्यता आहे.

महिला कर्मचाऱ्याचा पती झाला वितरक

कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात असलेल्या एका महिला कृषी पर्यवेक्षकाच्या पतीने कंधार येथे सूक्ष्मसिंचन संच वितरणाचे दुकान थाटून बनावट पावत्यांच्या आधारे संच पुरविल्याचे दाखविले आहे. यात पत्नीचे प्रस्ताव सर्वाधिक होते. चौकशीत केलेल्या पाहणीत या महिला कृषी पर्यवेक्षीकेने तब्बल ४५० प्रस्ताव रक्कम वितरित करण्यासाठी पाठविले होते. यातील केवळ २५ प्रस्ताव पात्र ठरले तर ४२५ प्रस्ताव अपात्र ठरल्यामुळे शासनाच्या दोन ते अडीच कोटींची बचत झाल्याचे दिसून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com