Rural Economy : म्हसा यात्रेमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती

Bamboo Craft : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या म्हसा यात्रेत बांबूच्या हजारो टोपल्या विक्रीसाठी आलेल्या आहेत.
Bamboo Craft
Rural Economy Agrowon
Published on
Updated on

Murbad News : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या म्हसा यात्रेत बांबूच्या हजारो टोपल्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील यात्रेकरूंबरोबरच शहरी भागात राहणाऱ्यांनी या रंगीबेरंगी टोपल्या खरेदी करण्यास पसंती दिली आहे. बैल बाजाराच्या जवळच बांबूच्या टोपल्या, सुपे, काठ्या खरेदी करण्यासाठी यात्रेकरू फिरत होते.

सुपांचा उपयोग धान्य, कडधान्य साफ करणे, भाज्या निवडणे व साफ करण्यासाठी होतो. भाज्या, फळे ताजी राहावीत म्हणून ती बांबूच्या टोपल्यांमध्ये ठेवली जातात. कांदे, बटाटे, लसूण ठेवण्यासाठीही गृहिणी बांबूच्या टोपल्यांना पसंती देतात; तर मोठ्या टोपल्या शेतीच्या कामासाठी उपयोगाला येतात.

राबणीसाठी गवत, पाला वाहून नेण्यासाठी शेतकरी मोठे चाफ वापरतात. म्हसा, धसई, टोकावडे परिसरातील आदिवासी, कुणबी, आगरी समाजाचे लोक म्हसा यात्रेच्या दोन-तीन महिने आधीच बांबूच्या टोपल्या, सुपे, फुले ठेवण्यासाठी परड्या तयार करण्याचे काम सुरू करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा वर्षभराचा किरकोळ खर्च करण्यासाठी पुंजी मिळते. बांबूच्या वस्तू बनवणारे अनेक कारागीर मुरबाड तालुक्यात आहेत.

Bamboo Craft
Rural Economy: गावाच्या जत्रांची मजा शहराच्या मॉलला नाहीच!

मेसाचे बांबू व भरीव बांबूपासून विविध वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबर यात्रेत येणाऱ्या तात्पुरत्या दुकानासाठी मांडव तयार करण्यासाठी बांबू वापरला जातो. बांबू काम करणारे कारागीर त्यापासून विविध वस्तू तयार करतात. त्यानंतर या बांबूपासून बनवलेल्या वस्तू आकर्षक दिसण्यासाठी वस्तूंना रंग दिला जातो.

Bamboo Craft
Rural Economy : महाराष्ट्र देशा... शहामृगांच्या देशा...

बैलगाडीची विक्री

गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हसोबाच्या यात्रेत यंदा शर्यतीसाठी लागणाऱ्या बैलगाडीसुद्धा विक्रीसाठी आलेल्या आहेत. शेतीच्या कामासाठी बैलगाडी व बैल जोडी घेणारे मालक आता कमी झाले आहेत, तर शौकीन श्रीमंतांचा ओढा आता बैलगाडा शर्यतीकडे वळला आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील आत्माराम गावडे या एका व्यापाऱ्याने शर्यतीसाठी लागणारा बैलगाडा विक्रीसाठी आणला होता.

म्हसा यात्रेनिमित्त बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना चांगला भाव मिळतो. या वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे बांबू आमच्या परिसरात उपलब्ध होतो. शहरी भागातील ग्राहक कारागिरी पाहून चांगली किंमत देतात. त्यामुळे पावसाळ्यापर्यंतचे सामान खरेदी करता येते.
- दामू वाघ, टोपली विक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com