Jat water Issue : जतमध्ये पाणीप्रश्न, म्हैसाळ योजनेचा मुद्दा गाजणार

Mhaisal Irrigation Scheme : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जत तालुक्यात प्रत्येक निवडणुकीवेळी पाणी प्रश्न आणि म्हैसाळ योजना पूर्णत्वाकडे या दोन गोष्टींवर आजअखेर निवडणूक रंगली असून या मुद्द्यांवरच निवडणुका जिंकल्या आहेत.
Mhaisal Water Scheme
Mhaisal Water SchemeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जत तालुक्यात प्रत्येक निवडणुकीवेळी पाणी प्रश्न आणि म्हैसाळ योजना पूर्णत्वाकडे या दोन गोष्टींवर आजअखेर निवडणूक रंगली असून या मुद्द्यांवरच निवडणुका जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतही विस्तारित म्हैसाळ योजनेच्या मुद्द्यावरच प्रचाराची रंगणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

जत विधानसभेत काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढतीचे संकेत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने जत विधानसभेचे संपूर्ण चित्रच पलटून गेले. गेली पाच वर्षे भाजपचे तम्मनगौडा रवी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मतदार संघात जोरदार तयारी केली आहे.

Mhaisal Water Scheme
Jat Water Issue : निर्णय होऊनही पाझर फुटलाच नाही..!

मात्र, गोपीचंद यांच्या दावेदारीने भूमिपुत्राच्या मुद्द्याने उचल खाल्ली आहे. भाजपकडून माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह स्थानिक भाजपच्या नेत्यांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावर जतच्या जनतेमध्ये एक भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारात हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. लोकसभा असो वा विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये या पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी देऊ असा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा असतो. हाच धागा पकडून आजअखेर तालुक्यात प्रचार झाला. अन् प्रत्येक पक्षाचे उमेदवार ही निवडणूक जिंकले आहेत.

Mhaisal Water Scheme
Jat Water Issue : जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू

प्रामुख्याने जत शहरांमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. जतच्या पूर्व भागाला म्हैसाळ योजनची विस्तारित योजना भाजपने मंजूर केली. ही योजना मार्गी लावल्याने पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न या प्रचारसभेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात पाणी प्रश्न, म्हैसाळ योजनेचा मुद्दा गाजणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसीला मंजुरी देऊन भाजपने सक्षम रोजगार व उद्योग उभे करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ही मंजुरी केवळ निवडणुकीत मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी काढलेला फतवा आहे, हे पटवून देण्यात काँग्रेसला कितपत यश मिळते हे महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com