Jat Water Issue : निर्णय होऊनही पाझर फुटलाच नाही..!

जत तालुक्याच्या पूर्व भागात म्हैसाळचे पाणी पोहोचणार नसल्याचे गेल्या अनेक वर्षापासून चर्चा नेत्यांनी केली आहे. या भागाला कर्नाटकातूनच पाणी सहजरित्या मिळू शकते असा निर्णय २०१३ मध्ये झाला होता.
Jat Water Issue
Jat Water IssueAgrowon

सांगली : जत तालुक्याच्या (Jat Taluka Water Issue) पूर्व भागात म्हैसाळचे पाणी (Mhaisal Water Scheme) पोहोचणार नसल्याचे गेल्या अनेक वर्षापासून चर्चा नेत्यांनी केली आहे. या भागाला कर्नाटकातूनच पाणी सहजरित्या मिळू शकते असा निर्णय २०१३ मध्ये झाला होता.

Jat Water Issue
Maharashtra-Karnataka Border Dispute : लोकप्रतिनिधी, मंत्र्यांकडून आमचा स्वत:साठी वापर

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी १० कोटींच्या निधीचे तरतूदही केले होते, मात्र याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने या उभय सरकारांना आता तरी पाझर फुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पूर्व भागात पाणी देण्यासाठी अनेक मंत्री पुढे आले. दरम्यानच्या काळात म्हैसाळ योजनेचा सहावा टप्पा सुरु करून जत तालुक्याला पाणी देण्यासाठी नियोजन सुरु केले. परंतु सहावा टप्पा ऐवजी टप्पा ५ ‘अ’ आणि ५ ‘ब’ असे दोन टप्पे करण्यात आले, त्यानुसार जत तालुक्यात पाणी आले. परंतु पूर्व भाग पाण्यापासून वंचित राहिला.

Jat Water Issue
Maharashtra Border Issue : पन्नास वर्षानंतरही सरकारचे दुर्लक्षच!

पुढे तत्कालीन पालकमंत्री स्व. पतंगराव कदम यांनी या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी ‘या भागाला म्हैसाळचे पाणी देणे कठीण आहे, त्या ऐवजी कर्नाटकातून पाणी देणे सोईस्कर होईल’, त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला देण्यात आले होते.

Jat Water Issue
Maharashtra Border Issue : जत तालुक्याचे विभाजन कधी?

महाराष्ट्रातून कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देवून त्यातील एक टीएमसी पाणी हे जत तालुक्याच्या पूर्व भागाला देते येवू शकते, त्याचा अभ्यास सुरु केला. २०१३ मध्ये हिरेपसलडगी योजनेतून जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देणे शक्‍य आहे, असे सांगण्यात आले. या गावांना तांत्रिक दृष्ट्या पाणी कसे देता येईल याचा अहवाल तयार केला, आणि तो शासनाकडे दिला.

कर्नाटकातील तुबची-बबलेश्‍वर योजनेतून या गावांना पाणी देणे शक्‍य होईल असा अहवाल पाटबंधारे विभागाने तयार केला. त्यानुसार या योजनेसाठी माजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले. मात्र, त्यानंतर त्यांचे सरकार कोसळले. पण, हा प्रश्न काही मार्गी लागला नाही.

कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून जत तालुक्यातील पूर्व भागात पाणी मिळाले असते तर, जवळपास ७२ हजार क्षेत्र ओलिताखाली आले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले. त्यानंतर जत पूर्व भागात पाणी देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चर्चा सरकारपातळीवर झाल्या नाहीत.

दरम्यान, २०१३ मध्ये पाटबंधारे विभागाने तयार केलेला अहवाल कुठे गेला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पाटबंधारे विभागाने केलेला अहवाल आणि कर्नाटक राज्याशी चर्चा करून पुढे हा प्रश्न मार्गी लागला असता, परंतु केवळ आश्वासन देवून जनतेला वेठीस धरले आहे. त्यामुळे या दोनही सरकारांना पाझर फुटणार का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. (समाप्त)

कर्नाटकाचा स्वार्थ

कर्नाटकच्या तुबची-बबलेश्‍वर योजनेतून जत तालुक्याच्या पूर्व भागात येते. मुळात जत पूर्व भागापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर वसलेलं कर्नाटकातील चडचण गाव. या गावातील शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने तुबची-बबलेश्वरमधून पाणी सोडण्यात येते. हे पाणी तिकोंड, बोर्गी नदी, सोनलगी गावातून चडचण हद्दीत जाते. मुळात कर्नाटक राज्याचा पाणी सोडण्यात स्वार्थच आहे असे म्हणावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com