Panpimpali Farming : औषधी वनस्पती पानपिंपळीला हवा राजाश्रय

Panpimpali : अंजनगावसुर्जी तालुक्यात पानपिंपळी या औषधी पिकावर बारी समाजातील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. पाण्याची व्यवस्था असलेले सर्वच शेतकरी या पिकाची लागवड करतात.
Panpimpali Farming
Panpimpali FarmingAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Medicinal Plant :अमरावती ः अंजनगावसुर्जी तालुक्यात पानपिंपळी या औषधी पिकावर बारी समाजातील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. पाण्याची व्यवस्था असलेले सर्वच शेतकरी या पिकाची लागवड करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलामुळे या पिकावर रोगांचा मोठा प्रभाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील पानपिंपळी उत्पादक शेतकऱ्यांनी अतिपाऊस व त्यामुळे मर रोगाचा वाढता जोर, यामुळे दिवसेंदिवस भेडसावत असलेल्या समस्यांबाबत निराकरण करून प्रोत्साहन मिळावे, यासाठी सानुग्रह अनुदानातून काही अंशी मदत मिळावी, अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी केली.

Panpimpali Farming
Panpimpali Farming : सातपुड्यात शेतकऱ्यांनी जपलाय औषधी पानपिंपळीचा वारसा

२०१२-१३ व १३-१४ यावर्षी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान या शेतकऱ्यांना मिळाले. परंतु शासनाच्या वतीने त्यानंतर अनुदान देणे बंद करण्यात आले. पिकांची दयनीय अवस्था व अनुदान नाही, या कारणांनी २०१२ मध्ये शहरातील पानपिंपळी उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केल्याचे प्रकार घडले. परंतु त्याचा शासनावर कोणताही परिणाम झाला नाही. अनुदानासाठी २०२४ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती गठित करण्यात आली. समितीच्या बैठकीत पानपिंपळीला पिकाचा दर्जा मिळावा, पीकविम्यात तरतूद, लागवडीसाठी पीककर्जाची तरतूद, नवीन वाण संशोधन, पिकाशी निगडित प्रक्षेत्र भेटी व प्रशिक्षण, याविषयावर विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.

यामध्ये या पिकाला हेक्टरी एक लाखापर्यंत कर्जाची तरतूद, पीकविम्यामध्ये समावेश करून झालेल्या नुकसानीबाबत त्याची रिस्क समाविष्ट करून प्रत्येक टप्प्याला ४०, ४०, २० हजार असे एक लाख रुपयांपर्यंत विमा हप्ता मिळावा व त्यासाठी योग्यप्रकारे ट्रिगर लावण्यात यावा आणि विमा हप्ता हा शेतकऱ्यांना परवडणारा असावा, यावर चर्चा करून प्रकल्प अहवाल तयार करून तो कृषी विभागाकडून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. याला वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु एक वर्षाचा कालावधी झाला असतानासुद्धा पानपिंपळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.

पानपिंपळी पिकाची लागवड व मशागतीला येणारा खर्च हा एकरी अडीच ते तीन लाख आहे. एवढा खर्च झाला असताना दरवर्षी या पिकावर सतत मर रोग व इतरही प्रादुर्भाव दिसून येतो. सद्यःस्थितीत या पिकाला कमी भाव मिळत असल्याने पीक न परवडणारे झाले आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करावी व अनुदानातून सहानुभूती द्यावी.

- मनोहर मुरकुटे, पानपिंपळी उत्पादक शेतकरी

पानपिंपळी पिकाला शासनाकडून अनुदान मिळत असे. परंतु गेल्या सहा वर्षांपासून ते बंद झाले. सतत पाऊस आणि त्यानंतर पिकावर येणारा मर रोग त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले, अशा परिस्थितीत सावकाराचे कर्ज आणि बँकेचे कर्ज फेडता फेडता शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेले अनुदान सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना थोडासा आधार होईल.

- सुभाष थोरात, सचिव, नागार्जुना औषधी वनस्पती फार्मर प्रोड्यूसर कंपनी

पिंपळी हे वेलवर्गीय पीक आहे. त्याचे औषधी तसेच मसाला पिकामध्ये वर्गीकरण होते. कार्ड संस्थेच्या माध्यमातून या पिकाचा विकास व उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे तसेच पिकास भौगोलिक मानांकन आणि प्रमाणीकरण याबाबत यशस्वी प्रयत्न केलेत. नैसर्गिक संकटाने होणाऱ्या हानीबाबत शासनाने याबाबत सहानुभूती दाखवावी.

- विजय लाडोळे, कार्ड संस्था प्रमुख, अंजनगावसुर्जी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com