

Amaravati News : कडाक्याच्या उन्हाचा असलेल्या मे महिन्यात यंदा पावसाळा अनुभवावा लागला. गेल्या २७ दिवसांत तब्बल २२ दिवस पाऊस बरसला. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असून १ ते २७ मे या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७१.२ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत या पावसाचे प्रमाण १०९५ टक्के आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७१ मिमी पाऊस हा गेल्या तीन दशकातील उच्चांकी पाऊस आहे. दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्येही एप्रिल महिन्यात पावसाची हजेरी होती. मात्र ती सार्वत्रिक नव्हती.
यंदा मे महिन्याच्या प्रारंभीचे चार दिवस व २३ मे कोरडा गेला. २२ मे रोजी सर्वाधिक पावसाची नोंद असून तो २५ मिमी झाला. मे महिन्यात १ ते २७ मे या कालावधीत ६.५ मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा झालेल्या पावसाचे प्रमाण १०९५ टक्के राहिले आहे.
२२ दिवस झालेल्या पावसाबरोबर वादळीवाऱ्याने घरांची पडझड होण्याबरोबरच झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे पशुधन दगावले, तर वीज पडून तीन जणांना जीव गमवावा लागला. वित्तहानीबरोबरच जीवितहानीही या महिन्यातील पावसाने झाली.
त्यामुळे मे महिन्यात आपत्ती नियंत्रण कक्षाला आपत्ती निवारण्याची कामे करण्याची वेळ आली. आतापर्यंत झालेल्या ७१ मिमी पावसात पेरणीची घाई मात्र शेतकऱ्यांनी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
सर्वाधिक पाऊस दर्यापूर तालुक्यात
मे मध्ये सर्वाधिक पाऊस दर्यापूर तालुक्यात १०८ मिमी झाला असून सर्वांत कमी पावसाचे प्रमाण अंजनगावसुर्जी तालुक्यात ५.३ मिमी नोंदविण्यात आले आहे. भातकुली तालुक्यात १०५.६, अमरावती ९४, वरुड ९३.९, चांदूररेल्वे ९२.३, तिवसा ८५.६, मोर्शी ८२.१ व चिखलदरा ६२ मिमी, असे पावसाचे प्रमाण आहे. धारणी ४०.५ मिमी, अचलपूर ३५.१, चांदूरबाजार ४४.६ व धामणगावरेल्वे तालुक्यात ३१.२ मिमी पाऊस झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.