Buffalo Farming: म्हैसपालनामध्ये दडलीय व्यावसायिक संधी

Animal Husbandry: भारतात आजमितीला शास्त्रीय पातळीवर नोंदणीकृत म्हशीच्या वीस जाती आहेत. म्हशींमधील अधिक दूध उत्पादन क्षमता, दीर्घकाळ दुग्धोत्पादन कालावधी, रोगप्रतिकारक्षमता अशा विविध जमेच्या बाजूंमुळे तरुणवर्ग म्हैसपालन व्यवसायाकडे आकर्षित होत आहे.
Buffalo
BuffaloAgrowon
Published on
Updated on

Livestock Business: भारतात आजमितीला शास्त्रीय पातळीवर नोंदणीकृत म्हशीच्या वीस जाती आहेत. म्हशींमधील अधिक दूध उत्पादन क्षमता, दीर्घकाळ दुग्धोत्पादन कालावधी, रोगप्रतिकारक्षमता अशा विविध जमेच्या बाजूंमुळे तरुणवर्ग म्हैसपालन व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. येत्या काळात व्यवस्थापन, आनुवंशिकता, पोषण, आरोग्य, उत्पादन निर्मिती प्रक्रियेतून आर्थिक उत्पन्न वाढीस चालना देण्याची गरज आहे.

भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीइतकीच पशुधनाची देखील भूमिका मध्यवर्ती आहे. शेतीसह पूरक व्यवसाय म्हणून समजल्या जाणाऱ्या पशुपालन क्षेत्राने एकविसाव्या शतकात व्यावसायिक उभारी घेत रोजगाराच्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच ७० टक्के कृषी आणि कृषी आधारित भारतीय समाज आपल्या सामाजिक, आर्थिक प्रगतीची बीजे पशुपालन क्षेत्रात शोधताना दिसतो. दूध, मांस, अंडी, शेणखत, लोकर अशा विविधांगी प्राणीजन्य उत्पादनातून मानवाला स्थिर जीवनासाठी `अन्नसुरक्षा आणि अर्थार्जन’ अशा वाटा गवसल्याने पशुपालन क्षेत्र मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे.

Buffalo
Animal Husbandry : गोपालनात आहार, आरोग्य व्यवस्थापनावर भर

आकडेवारी काय सांगते?

जागतिक पातळीवर व्यावसायिक दूध उत्पादन क्षेत्रात असलेले म्हशींचे भरीव योगदान भारतासारख्या देशात (४५ टक्के) आपले महत्त्व राखून आहे. प्राचीन काळापासून सुरू झालेले म्हैसपालन सुरवातीला मांस उत्पादन आणि शेतीकामांसाठी व्हायचे, मात्र नजीकच्या काळात प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी होताना दिसते. गोधनाच्या तुलनेत म्हशींमधील अधिक दूध उत्पादन क्षमता, दीर्घकाळ दुग्धोत्पादन कालावधी, रोगप्रतिकारक्षमता अशा विविध जमेच्या बाजूंमुळे तरुणवर्ग म्हैसपालन व्यवसायाकडे आकर्षित होत आहे.

जगभरात सुमारे २०२ दशलक्ष म्हशी असून, त्यापैकी सुमारे १०९.८ दशलक्ष म्हशी (५४ टक्के) भारतामध्ये.

भारताच्या एकूण दूध उत्पादनात ४५ टक्के म्हशींचा वाटा. प्रस्थापित/ जातिवंत म्हशी आणि संकरित / मिश्र अशा दोन प्रकारच्या म्हशी दिसतात. ज्यांची एकूण सरासरी प्रतिदिन दूध उत्पादन क्षमता अनुक्रमे ६.६२ किग्रॅ आणि ४.८१ किग्रॅ आहे.

Buffalo
Animal Husbandry: पशुसंवर्धन म्हणजे काय रे भाऊ?

शासकीय अहवालानुसार, दशकापूर्वी (२०१४-१५) असलेले म्हशींची एका वेतातील दूध उत्पादन क्षमता १७९२ किग्रॅवरून अलीकडच्या काळात (२०२१-२०२२) सरासरी २,०२२ किग्रॅपर्यंत पोहोचली. हे म्हशींच्या आनुवंशिक सुधारणेचे द्योतक. मात्र रेड्यांची संख्या कमालीची घटत आहे.

२०१९ च्या विसाव्या पशुगणनेनुसार, म्हशींच्या संख्येत महाराष्ट्र राज्य देशात पाचव्या क्रमांकावर असून, म्हशींची संख्या १.०६ टक्क्यांनी वाढली. राज्यात म्हैसवर्गात ५६ दशलक्ष पशुसंख्या असून, सध्या सुरू असलेली आगामी पशुगणना (२०२४) आकडेवारी अधिक सुस्पष्ट होईल.

दूध उत्पादनाची स्थिती

भारत २३०.५८ दशलक्ष टन दूध उत्पादनासह जगात प्रथम क्रमांकावर. देशात एकूण दूध उत्पादनात महाराष्ट्राचा (६.५२ टक्के) सहावा क्रमांक.

दरडोई भारतीयास सरासरी ४५९ ग्रॅम प्रतिदिन इतके दूध उपलब्ध. यात सर्व राज्यांच्या तुलनेत, पंजाब राज्यात सर्वाधिक १,२८३ ग्रॅम/दिन आणि महाराष्ट्रात ३२९ ग्रॅम/दिन इतकी दरडोई दूध उपलब्धता.

एकूण दूध उत्पादनात म्हशींचा वाटा ४४.८० टक्के वाटा. यामध्ये जातिवंत देशी म्हशींचा वाटा ३१.९४ टक्के आणि गावरान / गावठी/ अवर्णीत म्हशींचा वाटा १२.८७ टक्के.

मांस उत्पादन

भारताचे एकूण मांस उत्पादन ९.७७ दशलक्ष टन.

मांस उत्पादनात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर भारत.

देशात महाराष्ट्र (११.५० टक्के) मांस उत्पादनात तृतीय क्रमांकावर.

आपल्या देशात दरडोई सरासरीने ७.२ किलो प्रतिवर्ष इतकी मांस उपलब्धता, महाराष्ट्रात ९.६० किलो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com