Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

Election Results Update : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये घवघवीत यश प्राप्त केले.
Election Results
Election ResultsAgrowon
Published on
Updated on

Parbhani / Nanded News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये घवघवीत यश प्राप्त केले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. नांदेड जिल्ह्यातील ९ पैकी ७ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते.

सोयाबीन, कापूस आदी शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, आरक्षण या वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्या विसरत मतदारांना लाडकी बहिण योजना तसेच लक्ष्मी अस्त्राची भुरळ पडली. त्यामुळेच महायुतीला एवढे मोठे यश मिळवता आले. जिंतूर मतदारसंघात मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भांबळे यांना सलग दुसऱ्यांदा ४ हजार ५१६ मतांनी धूळ चारली.

जागा कायम राखली. परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) आमदार डॉ. राहुल पाटील यांनी थेट लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) आनंद भरोसे यांचा ३४ हजार २१६ मतांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली. गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) विशाल कदम यांच्यावर २७ हजार मतांनी मात करत सलग दुसऱ्यांदा गड कायम राखला.

Election Results
Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) आमदार राजेश विटेकर यांनी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांचा १३ हजारांवर मतांनी पराभव केला. वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजू नवघरे यांनी सरळ लढतीत त्यांचे राजकीय गुरू राष्ट्रवादी (पवार) जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर २९ हजार ५८८ मतांनी मात करत सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. कळमनुरी मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी विजय मिळवला. हिंगोलीत भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेना (ठाकरे) रूपाली पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला.

नांदेड जिल्ह्यात महायुतीची जोरदार मुसंडी....

नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यातील ९ पैकी निर्णायक निकाल हाती आलेल्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ५ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) १ जागा, शिवसेना (शिंदेगट) २ जागा, नांदेड दक्षिण या ठिकाणी कॉग्रेस आणि शिवसेना (शिंदे) गटत चुरस असल्याचे दिसून येत आहे. भोकर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या श्रीजया अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचे तिरुपती कोंढेकर यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.

किनवट मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम यांनी विजय संपादन केला. नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) आनंद बोंडारकर आणि कॉंग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या चुरस दिसून येत आहे. कधी हंबर्डे तर कधी बोंडारकर आघाडी घेत आहेत. नायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार यांनी कॉंग्रेसच्या डॉ. मीनल खतगावकर यांच्यापेक्षा आघाडी घेतल्याने पवार विजयाच्या समिप आहेत.

Election Results
Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

मुखेड मतदारसंघात भाजपचे डॉ. तुषार राठोड यांनी कॉंग्रेसचे हनमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे. देगलूर मतदारसंघात भाजपचे जितेश अंतापूरकर यांनी कॉंग्रेसचे निवृत्ती कांबळे यांच्या तुलनेत निर्णायक आघाडीवर आहेत. हदगाव मतदारसंघात शिवसेनाचे (शिंदेगट) बाबूराव कदम-कोहळीकर यांनी कॉंग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे. नांदेड-उत्तर मतदारसंघात शिवसेनाचे (शिंदेगट) बालाजी कल्याणकर यांनी कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. अंतिम निकाला हाती येणे बाकी आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपची आघाडी

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपने आघाडी घेतली आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे यांनी कॉंग्रेसचे प्रा. रवींद्र चव्हाण यांच्यावर आघाडी घेतली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस व भाजप उमेदवारांत निर्णायक आघाडी नसल्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारेल हे पाहणे बाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com