Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची १७ हजार हेक्टरवर पेरणी

Summer Crop : यंदाच्या (२०२५) उन्हाळी हंगामात गुरुवार (ता.६) पर्यंत परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ हजार ३८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Sowing
Sowing Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२५) उन्हाळी हंगामात गुरुवार (ता.६) पर्यंत परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ हजार ३८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या वर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे उन्हाळी पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १० हजार ९५८ हेक्टरपैकी ५ हजार ९६० हेक्टर (५४ टक्के) पेरणी झाली आहे. तेलबियांची ९ हजार ४८२ पैकी ५ हजार ५२ हेक्टरवर (५३ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ४ हजार ८३८ हेक्टर (७१ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १५६ हेक्टर (६ टक्के), तिळाची ११.२४ पैकी ५४.२० हेक्टर (४८२ टक्के) तर सुर्यफुलाची ४ हेक्टर पेरणी झाली आहे.

Sowing
Summer Sowing : उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांचा ज्वारीकडे वाढता कल ; लागवड पोहोचली १८०० हेक्टरपर्यंत

कडधान्यांची ४९.०७ पैकी ३२.४० हेक्टर (६६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ३२.४ पैकी ५.४० हेक्टर (१७ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी ८७६ हेक्टर (६१ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १५६ हेक्टर, मक्याची १ हजार ३७७ पैकी ४३५ हेक्टर (३२ टक्के), बाजरीची ५०.२७ पैकी २८५ हेक्टर (५६७ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांची २६ हजार ३४८ हेक्टर पैकी ११ हजार ४२६ हेक्टरवर (४३ टक्के) पेरणी झाली आहे. तेलबियांची १४ हजार ८५६ पैकी ८ हजार ८४२ हेक्टरवर (६० टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३.९९ पैकी ७ हजार ४४९ हेक्टर (११५ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ९६ हेक्टर(१ टक्का), तिळाची १ हजार २३२ हेक्टर तर सूर्यफुलाची ६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Sowing
Summer Sowing : चार हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ५०२ हेक्टर (९ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी ४८३ हेक्टर (२५ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी ७ हेक्टर पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी २ हजार ८२ हेक्टरवर (३५ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी १ हजार ४०६ हेक्टर (१२८टक्के), मक्याची १ हजार २ पैकी १५९ हेक्टर (१६ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम २०२५ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ३१०० ७६६ २५.००

जिंतूर ३९७५ २२८७ ५८.००

सेलू २८० ६५५ २३७.००

मानवत ५५८ ४११ ७३.५६

पाथरी ४२२ ४७६ ११२.००

सोनपेठ ४५९ २९७ ५२.००

गंगाखेड ५८५ २०८ ३६.००

पालम ३१२ २२१ ७१.००

पूर्णा १२६३ ७५२ ६०.००

हिंगोली २७८१ १९६ ७.००

कळमनुरी १९८५ ४९०८ २४७.००

वसमत १३२६४ २१९० १७.००

औंढानागनाथ २१२० ३५०० १६५.००

सेनगाव ६१९६ ६३२ १०.००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com