Illegal Fertilizer Sale : चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर कारवाई

Krishi Seva Kendra : वैजापूर (ता. चोपडा जि. जळगाव) येथे जिल्हास्तरीय भरारी पथकाने मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र, वैजापूर या विनापरवाना सुरू असलेल्या कृषी केंद्रावर कारवाई केली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : वैजापूर (ता. चोपडा जि. जळगाव) येथे जिल्हास्तरीय भरारी पथकाने मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र, वैजापूर या विनापरवाना सुरू असलेल्या कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. छापा टाकून अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खतसाठा जप्त केला आहे.

वैजापूर हे सातपुडा पर्वतरागांत आहे. तेथे विनापरवाना कृषी केंद्राबाबत कृषी विभागास माहिती मिळाली होती. वैजापूर येथे योगीराज देवसिंग पाटील ( रा. नागलवाडी) हे २५ मे २०२५ पासून विनापरवाना अनधिकृतपणे न्यू लक्ष्मी कृषी केंद्रातून बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याचे आढळून आले.

Fertilizer
Fertilizer Supply : जूनअखेर मंजूर आवंटनापेक्षा कमी खतांचा पुरवठा

योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून बियाणे, आणि खत विक्रीसंबंधी परवाना न घेता अनधिकृतपणे कृषी केंद्रातून खते आणि बियाणे विक्री करत असल्याचे आढळले. भरारी पथकाने कृषी केंद्रात विना परवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे २० टन (४०५ गोण्या) एवढे चार लाख ५२ हजार ४४६ रुपयांचे रासायनिक खत, मका आणि कापसाचे दोन लाख ८३ हजार ४१८ रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले.

Fertilizer
Fertilizer Subsidy: संतुलित खत वापरास पूरक हवे धोरण

एकूण सात लाख ३५ हजार ८६४ रुपयांचे रासायनिक खत आणि बियाणे सापडले. या साठ्यासंबंधी विक्री बंदचे आदेश देण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगीराज देवसिंग पाटील यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण कायदा १९८५, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरारी पथकात मोहीम अधिकारी अविनाश खैरना, कृषी अधिकारी किरण पाटील, मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांचा समावेश होता. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, गणनियंत्रक संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी पदमनाभ म्हस्के यांचे मार्गदर्शन मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com