Land Dispute : शहीद जवानाच्या कुटुंबाला २३ वर्षांनी जमिनीचा ताबा

Land Possession Update : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील शहीद यशवंत अर्जुन ढाकणे यांच्या कुटुंबाला शासनाकडून देण्यात आलेली २ हेक्टर जमीन २३ वर्षांनी गुरुवारी (ता.२५) प्रत्यक्ष ताब्यात मिळाली.
Land Possession
Land PossessionAgrowon
Published on
Updated on

Dindori News : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील शहीद यशवंत अर्जुन ढाकणे यांच्या कुटुंबाला शासनाकडून देण्यात आलेली २ हेक्टर जमीन २३ वर्षांनी गुरुवारी (ता.२५) प्रत्यक्ष ताब्यात मिळाली. यासाठी तहसीलदार पंकज पवार यांनी पुढाकार घेत जमिनीचा ताबा मिळवून दिला आहे.

शहीद यशवंत ढाकणे यांना देशसेवा करताना ३ ऑगस्ट २००१ ला वीरमरण प्राप्त झाले होते. महाराष्ट्र शासनाने ढाकणे कुटुंबाला गावातीलच पश्चिमेकडील पाझर तलावाशेजारी असलेली शासनाची जमीन गट नंबर ३०७ क्षेत्र तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या एकूण क्षेत्रापैकी दोन हेक्टर क्षेत्र हे जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश क्र. मशा/कक्ष/३/६/१५७२/२००१ ता.१९/१/२००२ अन्वये वीरमाता बबूताई अर्जुन ढाकणे यांना वितरित करण्यासाठी आदेश पारित केले होते. मात्र, या क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत ढाकणे कुटुंब वेळोवेळी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील होते; परंतु यासाठी त्यांना २३ वर्षे अर्ज फाटे करावे लागले.

Land Possession
Cotton Production : कापूस गाठी बनविण्यासाठी शेतकरी गटाचा पुढाकार

दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी शासकीय आदेशाला प्राधान्य देत वीरमाता-पिता यांना न्याय मिळवून देण्यासाठी गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेतली. संबंधित अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. अखेर २६ जानेवारीपूर्वी २५ जानेवारीला स्वत: तहसीलदार पंकज पवार यांनी उपस्थित राहून वीरमाता-पिता यांना जमिनीचा ताबा दिला.

Land Possession
Kolhapur Drought Condition : दुष्काळ जाहीर पण मदत शून्य, मदतीच्या कामाची कार्यवाही लटकली कुठे?

यावेळी पोलिस उपनिरीक्षक कैलास देशमुख व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोहिमेत तहसीलदार पंकज पवार, मंडल अधिकारी भारती रकीबे, तलाठी शरद गोसावी, भूकरमापक मानकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमचा पुत्र शहीद यशवंत ढाकणे यास देशसेवा करताना वीरमरण प्राप्त झाले. शासनाने आम्हाला २३ वर्षांपूर्वी दोन हेक्टर जमीन दिली; पण ती प्रत्यक्षात ताब्यात मिळाली नव्हती. त्यावर अतिक्रमण होते. याबाबत तहसीलदार पवार यांनी आम्हाला न्याय दिला. त्याबद्दल त्यांचे आणि सर्व अधिकारी व ग्रामस्थ यांचे आभार.- बबूताई अर्जुन ढाकणे, वीरमाता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com