Jaykumar rawal news : पणन मंत्री जयकुमार रावल यांना न्यायालयाचा दणका; २६ एकर जमीन हडप केल्याचं प्रकरण

Land Grabbing : जमीन हडपल्याच्या प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका मंत्री जयकुमार रावल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. असा दावा करत माजी आमदार अनिल गोटे यांनी रावल यांच्यावर टिका केली आहे.
Jaykumar rawal
Jaykumar rawal Agrowon
Published on
Updated on

Court Rules on 26-Acre Land Dispute : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीच्या आणखी एका नेत्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना हडप केलेली जमीन परत करण्याचे आदेश धुळे जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. मंत्री रावल यांच्या कुटुंबाने धुळे जिल्ह्यातील दोंडाई शिवरातील २६ एकर जमीन हडप केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाई शिवारातील जमीन मंत्री जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहेत. मुंडे यांच्या राजीनाम्याने महायुतीची पहिली विकेट पडली आहे. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यात पणन मंत्री रावल यांच्यावर जमीन हडप केल्याच्या प्रकरणामुळे खळबळ उडण्याची चिन्हं आहेत.

जमीन हडपल्याच्या प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका मंत्री जयकुमार रावल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात हडप केलेली जमीन परत करण्याचे आदेश धुळे न्यायालयाने दिले आहेत, असा आरोप करत माजी आमदार अनिल गोटे यांनी रावल यांच्यावर टिका केली आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोडलं नाही. तर इतर गरीब कुटुंबीयांचं काय? असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला आहे.

Jaykumar rawal
Minister Jaykumar Rawal : पथदर्शी कामातून चेहरामोहरा बदलवू

जयकुमार रावल धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच राज्याच्या पणन आणि राज शिष्टाचार खात्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. रावल यांची आमदारकीची सहावी टर्म असून मुख्यमंत्री फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात रावल यांच्याकडे कॅबिनेट पद होतं. तर सध्या ते राज्याचे विद्यमान पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com