Marketing Department: पणन विभाग होणार स्वतंत्र

Maharashtra Marketing Restructure: डॉ. दांगट समितीच्या शिफारशींनंतरही पणन विभागाला आर्थिक आणि यंत्रणात्मक पाठबळ न मिळाल्यामुळे, त्याची पुनर्रचना करण्यासाठी सुधीरकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
Marketing Department
Marketing DepartmentAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: डॉ. दांगट समितीने शिफारस केल्यानंतरही राज्यातील शेतीमालाच्या विपणनासाठी स्वतंत्र आणि पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद नसलेला पणन विभाग स्थापन करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी अतिरिक्त मुख्य कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

ही समिती पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना व सक्षमीकरण करण्यासाठी मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र सवर्ग तयार करण्यासाठी अभ्यास करून शिफारशी तयार करणार आहेत. या समितीने एक महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Marketing Department
APMC Evaluation : राज्यातील बाजार समित्यांचे मूल्यमापन ‘पणन’कडून जाहीर

पणन विभागाच्या सक्षमीकरणासाठी माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमण्यात आला होता. या अभ्यास गटाने विविध शिफारशी केल्या होत्या. या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी त्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नाही. तशी आर्थिक तरतूद केली तरी शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा यंत्रणा नाहीत हे सरकारच्या लक्षात आले आहे.

Marketing Department
Junnar APMC Fraud : जुन्नर बाजार समितीच्या जमीन खरेदीची होणार चौकशी ; पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश

पणन विभागाच्या अधिनस्त राज्यस्तरावर पुणे येथे पणन संचलनालय आणि महाराष्ट्र राज्य कृषीय पणन मंडळ अशा दोन आस्थापना कार्यरत आहेत. मात्र जिल्हा आणि तालुका पातळीवर या दोन्ही आस्थापनांची कोणतीही यंत्रणा नाही. पणन विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील काम सहकार विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि सहायक उपनिबंधक उपलब्ध वेळेनुसार करतात. त्यामुळे पणन विभागाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे पणन विभागाच्या मंत्रालय आणि क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने समिती स्थापन करण्यात आली आहे.

निवृत्त अतिरिक्त कृषी सचिव सुधीर कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. उमाकांत दांगट, निवृत्त पणन संचालक सुनील पवार सदस्य, तर पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com