Flower Market : चांदवड बाजार समितीत झेंडूच्या फुलांचे लिलाव

Flower Auction : चांदवड तालुका व परिसरात दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शेतकरी झेंडू लागवडी करतात. त्यामुळे हंगामी स्वरूपातील या शेतीमालाचे लिलाव होण्यासाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाची सुविधा करून देण्यात आली आहे.
Chandwad Bazar Samiti
Chandwad Bazar SamitiAgrowon
Published on
Updated on

Nashik News : चांदवड तालुका व परिसरात दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शेतकरी झेंडू लागवडी करतात. त्यामुळे हंगामी स्वरूपातील या शेतीमालाचे लिलाव होण्यासाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाची सुविधा करून देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. १०) सभापती संजय दगुजी जाधव यांच्या हस्ते आवारात लिलावांचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी १००० क्विंटल फुलांची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपयांदरम्यान दर मिळाला.

बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात झेंडू फुलांचे हंगामी स्वरूपात लिलाव केले जातात. त्यानुसार पहिल्याच दिवशी १ हजार क्विंटल झेंडूच्या फुलांची आवक झाली. लाल झेंडूच्या फुलास प्रतिक्विंटल किमान २,००० ते कमाल ४,५०० सरासरी ३,६०० तर पिवळ्या झेंडूस किमान २,००० ते कमाल ५,००० सरासरी दर ४,००० रुपये मिळाले. बाजार समिती आवारात झेंडू विक्रीसाठी चांदवडसह परिसरातील फुले विक्रीस आली होती.

Chandwad Bazar Samiti
Kolhapur Flower Market : कोल्हापूर बाजारात फुलांच्या दरात वाढ, फळांसह पालेभाज्यांचे दर काय ?


गेल्या काही वर्षांत पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी फुलशेतीकडे वळाले आहेत. यंदा पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेतले आहे. सध्या आवक होणाऱ्या फुलांची प्रतवारी व गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे आवक कमी असताना दरावर काहीसा परिणाम आहे. बाजार समितीमध्ये फुलांच्या खरेदीसाठी मुंबई, कल्याण, दादर, नाशिकसह गुजरात राज्यातील व्यापारी उपस्थित होते.

Chandwad Bazar Samiti
Marigolds Flower : कोल्हापुरात झेंडू दरात तेजी, फूल उत्पादक शेतकरी समाधानी, इतर फुलांचे दरही वाढले

दसऱ्यानिमित्त शनिवारी (ता. १२) सकाळी ७.३० वाजता लिलाव असणार आहेत. तर दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ३० व ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता व १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता झेंडू फुलांचे लिलाव होणार आहेत. फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुले मोकळ्या स्वरूपात किंवा क्रेट्समध्ये बाजार आवारात विक्रीसाठी आणावीत. विक्री पश्चात रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात येईल.

शेतीमाल विक्रीची रक्कम तत्काळ रोख स्वरूपात घेण्यात यावी. फुले विक्रीसंदर्भात काही सूचना, तक्रारी असल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समिती व्यवस्थापनाने केले आहे. या वेळी फुले खरेदीसाठी व्यापारी सुनील जगताप, जितेंद्र जैन, विशाल खांदे, संदीप जाधव, रूपेश मिसर व त्यांचे खरेदीदार, तसेच कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदवड बाजार समितीत झेंडू फुले लिलावास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सभापती जाधव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com