Manoj Jarange Patil : मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा

Maratha Reservation : सगेसोयरे जीआर तात्काळ मंजूर करण्याच्या मागण्यासह विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आता कुठे जायचे... तर मुंबईला जायचे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : सगेसोयरे जीआर तात्काळ मंजूर करण्याच्या मागण्यासह विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आता कुठे जायचे... तर मुंबईला जायचे. येत्या २९ तारखेला सर्व मराठा बांधवांनी आपल्या लेकरांच्या भल्यासाठी मुंबईला आंदोलनासाठी यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वाघोली येथील सिझन २४ तास येथे रविवारी (ता.२०) जिल्हयातील लोकप्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मराठा सेवक, मराठा बांधव यांच्याशी भेटून चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. त्यावेळी मोठ्या स्वरूपात मराठा बांधव उपस्थित होता.

श्री जरांगे पाटील म्हणाले की, मागील ७० वर्षापासून मराठा बांधवावर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे सरकार ठिकाणावर येत आहे. मागे केलेल्या आंदोलनामुळे आता कुठेतरी मराठा मुलांना मराठा कुणबीचे दाखले मिळू लागले आहे. त्यामुळे शिक्षण, भरतीत न्याय मिळू लागला आहे. हे सरकारला आता सहन होईना, त्यामुळे आता सर्व मराठा बांधवानी जागी राहून काम करावे लागेल. हारण्याआधीच सावध असेल तर आपला समाज हारणार नाही.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे करणार मुंबई जाम

आत्तापर्यत मराठी माणसाच्या पिढ्यापिढ्याचे नुकसान झाले आहे. म्हणून सर्वांनी एकदा एकत्र येऊन लढावे लागेल. एकदा लढल्यावर सर्वांना फायदा होईल. त्यानंतर शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी प्रश्न हाती घेऊन सरकारला पुन्हा जागेवर आणू. येत्या २०२९ पर्यत सर्व नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी मराठा बांधवांना जागे करून एकप्रकारची सुप्त लाट तयार करावी लागेल. गाफील राहिले तर हार होते, त्यामुळे शिवाजी महाराजांनी जो काही गनिमी कावा शिकवला आहे, त्याची प्रेरणा घेऊन सर्वांना काम करावे लागेल.

आपली सरकारविषयी वाईट भावना नाही, इच्छाही नाही. पण अन्याय झाल्याने हे करावे लागते आहे. त्यामुळे जे आत्तापर्यत झाले नव्हते. ते एका झटक्यात झाल्याने काही प्रमाणात मराठा बांधवाचा फायदा झाला आहे. मराठा आंदोलनामुळे मला खूप दुश्मन झाले आहे.

पण मी त्यांना भीत नाही. सर्वाच्या भल्यासाठी मराठा बांधवानी साथ द्या, माझ्याकडून एकही चुकीचे पाऊल पडणार नाही, याची खात्री देतो असे सांगून मराठ्याचा नाद नाही करायचा. एकदा ठरवले की ते करायचे, त्यासाठी माघार नाही. त्यामुळे हा लढाही आपला सर्वांचा आहे.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय द्या

यासाठी सर्वांनी एकत्रितपणे यावे. गरज पडल्यास राजकीय लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सरपंच, सदस्य, मित्र अशा सर्वांना कळवून येण्यास भाग पाडावे. ते जर सांगूनही नाही आले तर होणाऱ्या निवडणुकीत त्यांना पाडा. कारण जर त्यांना आपल्या मुलांच्या प्रश्न व भल्यासाठी त्यांना वेळ नसेल तर आपण का त्यांच्या भल्याचा विचार करायचा असा प्रश्न उपस्थित केला.

आपल्याला ही एकच संधी आहे. समाजाला जे लागत ते जर दिल तर पुढील काळात आपल्या मुलांचा फायदा होईल. त्यासाठी सण, उत्सव असेल तरी ते बाजूला ठेऊन या, मुलांचे नुकसान करू नका आहे. एकदा आरक्षण मिळाले तर तर आनंदात सण, उत्सव साजरे करा असेही त्यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या :

- मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढावा

- हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा

- मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घ्या

- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना सरकारी नोंकरी व आर्थिक मदत तात्काळ करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com