Manoj Jarange Patil : मनोज जरांगे करणार मुंबई जाम

Maratha Reservation Protest : राज्यात मराठा समाज एक झाला आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अन्यथा आरक्षण २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करू.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Jalna News : राज्यात मराठा समाज एक झाला आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अन्यथा आरक्षण २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करू. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत यायचे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीत रविवारी (ता. २९ ) सांगितले.

श्री. जरांगे म्हणाले की, अंतरवाली सराटीत येथे ही शेवटची बैठक आहे. मुंबईत आंदोलनात पाय ठेवायला जागा राहणार नाही. आम्हाला लाठी, काठी लागली तर होणाऱ्या परिस्थितीला सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहणार आहे. आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यायचे आहे. पुणे, मुंबई, अहिल्यानगर या ठिकाणच्या नागरिकांनी मोठी जबाबदारी घ्यायची आहे. कोणी मराठ्यात फुट पाडू शकणार नाही.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी हो किंवा नाही सांगावं अन्यथा...; जरांगे -पाटील यांचा इशारा

आता मागे हटणार नाही, रणभूमीत उतरायचे आहे. मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही, विजय मिळाल्याशिवाय वापस येणार नाही. दोन वर्षांपासून संर्घष सुरू आहे. मुंबईला गेल्यावर गुलाल घेऊनच वापस येऊ. एकसंघ राहा गुलाल आपलाच आहे. गावागावांत तयारी करा. सरळ प्रवास करून दोन दिवस, दोन रात्रीत मुंबईला पोहोचायचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत वैर नाही. आम्हाला २९ ऑगस्टपर्यंत आरक्षण द्यावे.

नसता समाज तुम्हाला माफ करणार नाही. सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांनी सरकारला जाब विचारावा. आमच्यावरील अन्याय थांबला पाहिजे. आरक्षण मिळत नाही, मुंबई जाम केल्याशिवाय पर्याय नाही. शक्यतो पहिला मुक्काम शिवनेरी किल्यावर होईल. प्रवासात सर्व जीवनावश्यक वस्तू सोबत ठेवा. संतोष देशमुख हत्या व कोपर्डीच्या आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय द्या

जो राजकीय नेता, आमदार, खासदार, मंत्री, अध्यक्ष, सदस्य, नगरसेवक, सरपंच, सांगून देखील मोर्चात मुंबईला येणार नाही त्याला निवडणुकीत समाज मदत करणार नाही, असा इशारा श्री. जरांगे यांनी दिला.

अंतरवाली सराटी, वडिगोद्री, नालेवाडी, छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्ग आदी ठिकाणी वाहतुक विस्कळीत झाली, रस्ते जाम झाले होते. पोलिस यंत्रणा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मनोज जरांगे यांच्या मागण्या

- मराठा आणि कुणबी एक आहे,अध्यादेश काढावा, हैद्राबाद, बॉम्बे, साताराचे गॅजेट लागू करा, सगे सोयरेची अमंलबजावणी करावी. दाखल गुन्हे वापस घ्यावे, आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना नोकरी व आर्थिक मदत द्या. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी. नोंदी शोधण्याचे काम बंद झाले आहे ते चालू करावे. प्रमाणपत्र द्यावे, सर्व आमदार, माजी आमदार यांना फोन करून आरक्षण भूमिका फडणवीस यांच्याकडे मांडावी म्हणून सांगितले आहे. असे जरांगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com