Water Scarcity : मराठवाडा पाणीबाणीच्या दिशेने

Water Crisis : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांत केवळ १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला असून, पुन्हा एकदा मराठवाडा पाणीबाणीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची स्थिती आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांत केवळ १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला असून, पुन्हा एकदा मराठवाडा पाणीबाणीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची स्थिती आहे. लघू व मध्यम प्रकल्पांपैकी १३२ प्रकल्प पडले कोरडे पडले असून, ३१७ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, की मराठवाड्यातील ८१७ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांमधील २० टक्के, मध्यम ७५ प्रकल्पातील ९ टक्के, लघू ७४९ प्रकल्पांतील ९ टक्के व गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील २० टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ९ टक्के उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे.

Water Scarcity
Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंंचाई तीव्र

कोरड्या पडलेल्या १३२ प्रकल्पांमध्ये ४ मध्यम, तर १२८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या ४ मध्यम प्रकल्पांमध्ये बीडमधील दोन, तर धाराशिव व जालन्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. तब्बल २७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये धाराशिवमधील सर्वाधिक ११, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व परभणीतील प्रत्येकी एक, जालन्यातील चार, बीडमधील सहा, लातूरमधील ३ प्रकल्पांचा समावेश आहे.

कोरड्या पडलेल्या १२८ लघू प्रकल्पांमध्ये धाराशिवमधील सर्वाधिक ६२, बीडमधील ४३, छत्रपती संभाजीनगरमधील १२, तर लातूरमधील ११ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय २९० लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

त्यामध्ये धाराशिवमधील सर्वाधिक ८९, त्यापाठोपाठ लातूरमधील ७०, बीडमधील ४५, छत्रपती संभाजीनगरमधील ३१, परभणीतील १८, जालन्यातील १४, नांदेडमधील १३, तर हिंगोलीतील १० लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी धाराशिव, बीडमधील प्रत्येकी दोन, परभणी व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एक प्रकल्प मिळून ६ प्रकल्पांत २५ टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा उरला आहे. नांदेडमधील ३ व परभणी, हिंगोलीतील प्रत्येकी एका मोठ्या प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Scarcity
Water Scarcity : उन्हाळी आवर्तनानंतर ‘कुकडी’त पाणीबाणी

जिल्हानिहाय मध्यम प्रकल्प स्थिती

छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पात ६ टक्के, जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांत ४ टक्के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत १६ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात ६ टक्के, धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पात २३ टक्के, तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत केवळ ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्हानिहाय लघू प्रकल्प स्थिती

जालन्यातील ५७ लघू प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघू प्रकल्पात दहा टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ७ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात दहा टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत आठ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत २६ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत सहा टक्के, तर हिंगोलीतील २७ मध्‍यम प्रकल्पांत १२ टक्केच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांमधील

उपयुक्त पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)

धरण पाणीसाठा

जायकवाडी १३

येलदरी ३०

सिद्धेश्वर ४४

माजलगाव ००

मांजरा ०५

ऊर्ध्व पैनगंगा ४३

निम्न तेरणा ०१

निम्नमनार २९

विष्णुपुरी ३७

निम्न दुधना ०५

सीना कोळेगाव ००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com