Guardian Minister Abdul Sattar : मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक; सुधारित प्रस्ताव सादर करा

Marathwada Muktisangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. ही निर्मिती परिपूर्ण व्हावी यासाठी सुधारणा व नवीन बाबींचा समावेश आराखड्यात करून सुधारित प्रस्ताव शासनास तत्काळ सादर करा, असे निर्देश राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात शनिवारी (ता. ३) पालकमंत्री सत्तार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, मुख्य अभियंता श्री. भगत यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

Abdul Sattar
Water and Soil Conservation : कोरडवाहू शेतीमध्ये जल-मृद् संधारण महत्त्वाचे

या वेळी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकांमध्ये संत दर्शन गॅलरीमध्ये विविध संतांच्या आभासी प्रतिमा प्रदर्शित केली जाणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ स्तंभांचे आणि जिल्ह्याची ओळख दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे प्रतिबिंब यामध्ये असणार आहे.

Abdul Sattar
Water and Soil Conservation : कोरडवाहू शेतीमध्ये जल-मृद् संधारण महत्त्वाचे

मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या हुतात्म्याने बलिदान दिले. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा या ठिकाणी असणार आहेत. आर्ट गॅलरी, अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यातील चित्रे साकारली जाणार आहेत. ग्रंथालयामध्ये मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.

स्मारकातून कळणार मुक्तिसंग्राम

या स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांसाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम या स्मारकाच्या माध्यमातून समजणार आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com