Farmer Guidence: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील.