OBC Reservation : आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही

Maratha Reservation Update : मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही, पण वेगळे घ्या. कायद्याने घ्या दादागिरीने नव्हे, याद राखा माझ्या शेपटीवर पाय ठेवू नका. आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही असा एल्गार ओबीसी नेते भुजबळ यांनी केला.
OBC reservation
OBC reservationAgrowon
Published on
Updated on

Jalna News : मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही, पण वेगळे घ्या. कायद्याने घ्या दादागिरीने नव्हे, याद राखा माझ्या शेपटीवर पाय ठेवू नका. आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही असा एल्गार ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथून केला.

अंबड शहरात पाचोड रोडवरील धाईतनगरात शुक्रवारी (ता. १७) ओबीसी-भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली. प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. ‘एकच पर्व ओबीसी सर्व’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’, ‘भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी सभास्थानाचा आसमंत दणाणून गेला.

OBC reservation
Bihar Reservation : बिहारमध्ये ६५ टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर ; जात जनगणनेनंतर नितीश कुमारांचा मोठा डाव

व्यासपीठावर श्री. भुजबळ यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी आदी उपस्थित होते. श्री. वडेट्टीवार म्हणाले, की ज्याच्याकडे जमिनी नसतील त्याची व्यथा समजून घ्यायला हवी. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागावं, अन्यथा जागा दाखवून द्यावी लागेल. पंतप्रधानांना जातिनिहाय जनगणना करण्याची विनंती करू. ओबीसीच्या आरक्षणाला जिवात जीव असेपर्यंत धक्का लावू देणार नाही.

श्री. भुजबळ म्हणाले, की आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नव्हे, तर आरक्षण म्हणजे मागासलेल्यांना बरोबरीने आणण्याचा कार्यक्रम आहे. ओबीसींना आरक्षण हे घटनेने दिलेले आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले आहे. ओबीसींना आरक्षण सहजच मिळालेले नाही. जरांगे म्हणतात, ओबीसी आमचं खातात. तुझं खातो का रे, असा सवाल श्री. भुजबळ यांनी केला.

OBC reservation
Farmer Loan Waive : पुनर्गठन नको कर्जमाफीची किसान सभेच्या वतीने मागणी

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण हव आहे तर वेगळं घ्या. कायद्याने घ्या, दादागिरी करू नको. २७ टक्के ओबीसीला २७ टक्के आरक्षण कसं, असा जरांगे प्रश्‍न उपस्थित करतात. आम्ही म्हणतो जातिनिहाय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे. ही आमची मागणी आहे. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल,

मग कळेल ओबीसी किती आणि त्यांना आरक्षण किती मिळते ते. ओबीसी भटक्या विमुक्तांचे आरक्षण वाचविण्यासाठी पहिला आणि शेवटचा मेळावा नव्हे, तर अशा प्रकारचे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये, तालुक्यात मेळावे झाली पाहिजेत. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठीची ही ज्योत तालुक्यातालुक्यांमध्ये पेटली पाहिजे जशास तसे उत्तर द्यावे लागेल.

या सभेला आलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून श्री. भुजबळ म्हणाले, की तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा ६० टक्के ओबीसी भाजपला मतदान करतात. जर आमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ होत असेल, तर हे ६० टक्के ओबीसी काय करतील, याचा विचार करा, असेही ते म्हणाले. या वेळी श्री. पडळकर श्री. शेंडगे यांच्यासह इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com