Maratha Reservation : मराठा क्रांती महामोर्चाचा आक्रमक पवित्रा; आजपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू
Maratha Community Protest : मराठा आरक्षणाच्या मागणासाठी जालन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले असून त्यांनी राज्यभरात रास्तारोको, बंद पुकारला आहे. दरम्यान, आज मराठा क्रांती महामोर्चाच्यावतीने मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज घटनेच्या निषेधाचे पडसाद आता राज्यभरात तीव्र उमटले आहेत. सकल मराठा समाज मराठा क्रांती महामोर्चा मुंबईने आक्रमक पवित्रा घेत आरक्षणाची मागणी करीत मंगळवार, ५ सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण पुकारले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.
दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून त्याला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. आज राज्य सरकारच्यावतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.