Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांची तहान कायम

Water Stock : मराठवाड्यातील एकूण ८७९ मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ९१.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Water shortage
Water shortage Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ८७९ मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ९१.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांसह अनेक लघु, मध्यम प्रकल्पांची तहान पावसाळ्याअंती कायम आहे. त्यामुळे पाऊस जास्त दिसत असला तरी काही भागात पाण्याचा प्रश्न कायम असल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव निम्न तेरणा व निम्न दुधना प्रकल्पांची तहान कायम आहे. दुसरीकडे जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न मनार, विष्णुपुरी व सीना कोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. मध्यम ७५ प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ५, जालन्यातील ३, बीडमधील १४, लातूरमधील ३, धाराशिवमधील १०, नांदेडमधील ८ तर परभणीतील २ प्रकल्प तुडुंब आहेत.

Water shortage
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्क्यांवर

बीड नांदेड परभणी या जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा असला तरी छत्रपती संभाजीनगरमधील सोळा प्रकल्पात सरासरी ६४ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पात ७१ टक्के, लातूर व धाराशिव मधील अनुक्रमे ८ व १७ प्रकल्पात सरासरी ८४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Water shortage
Water Storage : नांदेडमधील पाच मोठे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु प्रकल्पांची अवस्था लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व काही अंशी बीड जिल्हा वगळता समाधानकारक मानता येणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघु प्रकल्पात सरासरी केवळ ५७ टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे, जो सर्वात कमी आहे.

जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पात ६६ टक्के, बीडमधील १२६ लघु प्रकल्पात ८६ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ६८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दु

सरीकडे लातूरमधील १३५ लघु प्रकल्पात ९२ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९७ टक्के तर परभणीतील २२ लघु प्रकल्पात ९० टक्के व हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पात ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला, असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com