Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात काय आहे, आरक्षण देणार किंवा नाही, हे समाजाला कळाले पाहिजे. त्यांनी या बाबत निर्णय घेतला पाहिजे, आरक्षण दिले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (ता. २७) माध्यमांशी बोलताना सांगितले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Jalna News: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात काय आहे, आरक्षण देणार किंवा नाही, हे समाजाला कळाले पाहिजे. त्यांनी या बाबत निर्णय घेतला पाहिजे, आरक्षण दिले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (ता. २७) माध्यमांशी बोलताना सांगितले.

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणकरीता श्री. जरांगे पाटील तसेच १०० ते १५० सहकारी शनिवारपासून (ता. २५) उपोषण करत आहेत. या ठिकाणी श्री. जरांगे पाटील यांचे सातवे उपोषण सुरू आहे. यांचा सोमवारी (ता. २७) तिसरा दिवस होता. उपोषणकर्ते यांची तब्येत खालावत चालली आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरू

श्री. जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. माध्यमांशी बोलताना श्री. जरांगे म्हणाले, की सरकारने संपर्क करण्याची गरज नाही. आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत हे कळाले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस हे आरक्षण देणार आहेत की नाही हे आम्हाला कळणे गरजेचे आहे. त्यांची काय भूमिका आहे स्पष्ट करावे.

मी उपोषण करण्यावर ठाम आहे. आम्ही खुनशी नाही, दहशतवादी नाही, आम्ही कुणाचा तिरस्कार करत नाही. येथे देशातील लोक भेटण्यासाठी येतात. आम्ही कोणाला नाही म्हणत नाही असे श्री. जरांगे पाटील म्हणाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी श्री. जरांगे पाटील यांची भेट घेण्याबाबत जालना येथे सांगितले होते.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : धुळे-सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’

यावर श्री. जरांगे पाटील यांनी, आमची कोणाला ना नाही असे सांगितले. आरक्षण प्रश्न सुटावा हा आमचा उद्देश आहे. अशोक चव्हाण, मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करावी किंवा कोणी दुसऱ्याने करावी, आमची हरकत नाही. मात्र आरक्षण मिळावे ही अपेक्षा आहे. या ठिकाणी आरक्षण देणे ही मुख्यमंत्री फडणवीस यांची जबाबदारी आहे.

बीडमधील घटनेबाबत गुंडगिरी संपवायची का वाढवयाची याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावा. अंतरवाली सराटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून कोणतेही शिष्टमंडळ पाठवले नाही, असे श्री. जरांगे पाटील यांनी सांगितले. उपोषणकर्त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे, डॉ. अनिल वाघमारे व सहकारी वैद्यकीय सेवा देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com