Manoj Jarange : आरक्षणावरून अंतरवाली सराटीत मराठा समाजाकडून राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटला नसून सगेसोयरे कायदा आणि ओबीसीतून समाजाला आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. यावरून रविवार (ता. २४) अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक होणार आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeAgrowon

Pune News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, सगेसोयरे कायदा व्हावा, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारने सगेसोयरेबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने जरांगे यांनी आंतरवाली सराटीत रविवार (ता. २४) मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरवली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी गावा गावात दोन उमेदवार देण्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. तर ९०० एकर जागेवर जरांगेंची सभा आयोजित केली जाणार असून याचे ठिकाण आणि तारीख देखील निश्चित होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला असून मराठा समाज आंतरवाली सराटीकडे निघाला आहे.

राज्यातील शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण घोषित केले. मात्र समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्यावरून घोंगडे भिजत ठेवल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तर जरांगेंनी पुन्हा एकदा राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत शिंदे सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. यावरून जरांगे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : पोटदुखीने जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणावर ठाम

दरम्यान आता लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागली असून मतदानाच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. तर मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने निर्णायक लढा देण्याचे ठरवले आहे. यासाठी रविवारी आंतरवाली सराटीत मराठा समाजाने जरांगेंच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात याकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil Hunger Strike : उपचार घेणार की नाही, भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे जरांगे यांना निर्देश

राजकीय पक्षांना धडा

सरकराने मराठा समाजाला आरक्षण घोषित केले. मात्र सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी केली नाही. विशेष अधिवेशनात देखील सगेसोयरे कायद्याबाबत घोषणा न झाल्याने जरांगेंसह मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक गावात दोन उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. याची देखील घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीचे वातावरण, आचारसंहिता यासह आंतरवाली सराटीत आज होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यामुळे आंतरवाली सराटीत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून येथे २०० पोलीस बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com