अभिजीत पोवारTribal Hostel Students: मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. २०११ मध्ये सरकारने घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासह जवळपास ४० मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणादरम्यान एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..या घटनेनंतर आंदोलक विद्यार्थी अधिक आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आणखी विद्यार्थी उपोषणात सहभागी होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच उपोषणादरम्यान एखाद्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे..Students Protest: झेन अल्फांनी वाकवले जिल्हा परिषद प्रशासन.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराआंदोलक विद्यार्थ्यांनी दि. ५ आणि १४ ऑगस्ट २०२५ रोजीचे शासन निर्णय तात्काळ रद्द करावेत, भत्त्यात महागाईनुसार वाढ करावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा १० लाख रुपयांचा विमा काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच गडचिरोली दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी आहे..Indian Politics: राजकारण-समाजकारणातील ‘सुपर क्रिटिकल’ टप्पा .यासोबतच बनावट जात प्रमाणपत्रधारक तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर‘मकोका’अंतर्गत कारवाई करावी, पेसा क्षेत्रातील १०० टक्के एसटी आरक्षण पूर्ववत करून १२ हजार ५०० पदे तात्काळ भरावीत, पुण्यात मुलींसाठी मध्यवर्ती ठिकाणी सुरक्षित इमारत उपलब्ध करून द्यावी, तसेच जात पडताळणीतील ‘रक्तनाते’ अट आणि ‘कंडिशनल व्हॅलिडिटी’ पद्धत बंद करावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत..राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्षकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर या आंदोलनाची राजकीय पातळीवरही दखल घेण्यात आली. त्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी भागातील आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली..मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार आणि आदिवासी विकास विभाग आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.